
कोल्हापूर : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एल.आय.सी)कोल्हापूर विभागामध्ये एस.सी.एस.टी.वेलफेअर असोसिएशन या संघटनांचे पदाधिकारी यांनी 26 एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा बदल्यांच्या अन्यायकारक धोरणाविरोधात दिला होता मात्र व्यवस्थापनाने ताबडतोब या आंदोलनाची दखल घेवून मागणी मान्य करण्याचा विचार हा केला गेला होता. आता जून महिना आला तरी मंडळाच्या प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेतला नसल्याने मंडळाच्या एस.सी.एस.टी.वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी सोमवारी १२ जूनला कार्यालयाबाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन सोमवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत केले जाणार आहे असे पदाधिकारी व तृतीय वर्ग कर्मचार्यांच्या वतीने एस.सी.एस.टी.वेलफेअर असोसिएशनचे वेस्टर्न झोन अध्यक्ष प्रशांत घाटगे व नागसेन कांबळे यांनी दिला आहे.
कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर,सिंधुदूर्ग,व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो.या संस्थेमध्ये तृतीय वर्ग कर्मचार्यांच्या बदल्यांसबंधी ठोस असे धोरण यापूर्वी नव्हते त्यामुळे बरेच कर्मचारी20 ते 25 वर्षे कोल्हापूर शहरात ठाण मांडून आहेत. त्यामुळे प्रमोशन घेवून बाहेरगावी गेलेल्या कर्मचार्यांना 5 ते 10 वर्षे बदली मिळू शकत नसल्याचे चित्र आहे. याउलट आर्थिक क्षेत्रातील इतर सर्व सरकारी संस्था न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया कंपनी,जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन व सर्व सरकारी बँकांमध्ये 5 ते 6वर्षानंतर बदल्यांचे नियम आहेत. मात्र भारतीय आयुर्विमा महामंडळामध्येच नाही.
संस्थेमधील अन्याय दूर करण्यासाठी केंद्रीय व्यवस्थापनाने ट्रान्सफर व मोबीलीटी पॉलीसी तयार करून त्याबाबतचे आदेश 22ऑक्टोबर 2016 रोजी जारी केले आहेत या आदेशानुसार जर बाहेर गावाहून कोणी शहरात बदली मागत असल्यास जास्त्त कालावधीसाठी शहरात असलेल्या कर्मचार्यांची बाहेर बदली करून बाहेर असलेल्यांना शहरात बदली देण्याचा नियम लागू केलेला आहे. हे आदेश प्राप्त झाल्यापासून त्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही पदाधिकारी कोल्हापूर विभागीय व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करत आहोत. पण व्यवस्थापनाने गेले सहा महिने टोलवाटोलवीची धोरण अवलंबिले आहे. 17 मार्च रोजीही वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक घोडगावकर यांना भेटून या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती. मात्र आता दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला असूनही याबाबत ठोस निर्णय हा घेतला गेला नसल्याने आता सोमवारी एक दिवसीय उपोषण करण्याचा एस.सी.एस.टी.वेलफेअर असोसिएशनने दिला आहे.
Leave a Reply