
कोल्हापूर : रेडिओ सिटी या देशातील पहिल्या आणि अग्रेसर एफएम सेवेने महाराष्ट्रासाठी विशेष शहरगीत तयार केले आहे. प्रसिध्द गायक जसराज जोशी यांनी तयार केलेल्या या श्रवणीय गीताची रचना दहा शहरातील प्रसारणासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे,अहमदनगर,नागपूर, नाशिक,कोल्हापूर,अकोला, नांदेड,सांगली,सोलापूर आणि जळगाव आदी शहरांचा समावेश आहे. प्रत्येक शहराची विविध स्थानिक वैशिष्ठ्ये या गीतामध्ये आहेत हे गीत एकत असताना श्रोत्याला आपल्या शहराबद्दल अभिमान वाटणार आहे. या गीतामध्ये प्रत्येक प्रसारण केंद्राची विशिष्ठ धून तयार करण्यात आली आहे.जी त्या श्रोत्यांमध्ये शहराची ओळख म्हणून लोकप्रिय होणार आहे.
कोल्हापूर शहराच्या गीतामध्ये प्रसिध्द महालक्ष्मी मंदिर,पन्हाळा किल्ला, तांबडा पांढरा रस्सा,कुस्ती मिसळ, रंकाळा तलाव यांचा उल्लेख करण्यात आला आहे. रेडिओ सिटीच्या प्रोग्रॅमिंग आणि मार्केटींग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख कार्तिक काल्ला यांनी शहरगीत म्हणजे आमच्या रग रग मे दौडे सिटी या विचारसरणीचे एक शुभचिन्हच असल्याचे सांगितले.महाराष्ट्रात रेडिओ प्रसारण सेवेत आम्ही 11शहरांमध्ये अग्रेसर आहोत. आमच्या हिंदी, गुजराती, कन्नड आणि तेलगु भाषेतील शहरगीताला मिळालेल्या प्रतिसादानंतर आम्ही महाराष्ट्रासाठी हे गीत तयार करण्याचे ठरविले आहे. असे सांगितले.
या गीताविषयी बोलताना जसराज जोशी यांनी मला एक राज्याविषयी अभिमान वाटायला लावणारे गीत गाता आले याचा अभिमान आहे. रेडिओ सिटीने असे एक गीत तयार केले आहे ज्यातून आपल्या राज्याविषयी अभिमान व्यक्त होणार आहे. रेडिओ सिटीला याबाबत अशी खात्री आहे की, या गीतामधून श्रोत्यांना त्यांच्या शहराबद्दल अभिमान तर वाटणारच आहे शिवाय रेडिओ सिटीशी एक भावनिक जवळीकताही निर्माण होणार आहे. असे सांगून या गीतामधून श्रोत्यांना त्यांची संस्कृती, स्थानिक वैशिष्ठये, त्यांच्यामध्ये रूजलेली जीवनशैली याची वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असे सांगितले.
Leave a Reply