
कोल्हापूर : कोल्हापुरात योग्य समन्वयाअभावी व्यावसायिक वाहतूक करणारे ट्रक-टेम्पो भाडे मिळविणेकरिता प्रदीर्घ अंतर रिकामा प्रवास करतात,ही मोठी उणीव भरून काढत किमान ३० टक्के डीझेल बचतीसह वेळेची बचत,वाहतुकीचा ताण कमी आणि पर्यायाने नफ्यात भरगोस वाढ करणारे भारतातील पहिले ऑनलाईन ‘ट्रान्सट्रेड’ पोर्टल म्हणजेच संगकणकीय प्रणाली संघवी ट्रान्सट्रेड प्रा.लि.यांनी यशस्वीपणे विकसित करून अमलात आणली आहे.अशी माहिती ललित संघवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.या प्रणालीमध्ये ट्रक ड्रायवर आणि माल पाठविणारा यांच्या वेळेची बचत तसेच व्यवहार प्रारंभापासून ते वस्तू पोहचविणे ही सर्व प्रक्रिया पारदर्शी असणार आहे तसेच सर्व व्यवहार ऑनलाईन आणि कॅशलेस होणार असल्याने फसवले जाण्याचा धोका यात नसणार आहे असे दीप संघवी यांनी सांगितले.डीझीटल मिडिया आणि ऑनलाइन पेमेंट यामुळे सरकारच्या कॅशलेस व्यवहारांना चालना मिळणार आहे.रिकामी वाहतूक कमी झाल्याने नॅशनल वाहतुकीमध्ये ३० ते ४० टक्के आणि लोकल वाहतुकीत ६० ते ७० टक्के इंधनाची बचत होणार आहे.प्रदूषण कमी होणार आहे.पहिल्या टप्प्यात कोल्हापूर पुणे मुंबई यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात ही प्रणाली कार्यरत असणार असून पुढे त्याचा विस्तार संपूर्ण भारतात करण्यात येणार आहे.वाहतूक क्षेत्रातील ही साखळी म्हणजे कोल्हापूरची महाराष्ट्रासह देशाच्या व्यावसायिक वाहतूक क्षेत्रात एक रचनात्मक भेटच आहे.
या क्षेत्रात येऊ पहाणाऱ्या इच्छुकांनी अधिक माहितीसाठी www.transtrade.in या वेबसाईट वर किंवा ग्राहक सेवा केंद्र ७८८७८८०००० तसेच संघवी ट्रान्सट्रेड मुनिसुव्रत प्लाझा, लक्ष्मीपुरी येथे संपर्क साधावा त्यांना थेट प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन मिळणार आहे.पत्रकार परिषदेला यश संघवी,देविका संघवी,कन्सल्टंट आर.एस.पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply