
कोल्हापूर : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या मंगळवार दि. 13 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होईल. 11 वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिराने निकाल जाहीर होतो आहे.
तुम्ही दहावीचा निकाल SMS वरही मिळवू शकता. बीएसएनएल ग्राहकांनी MHSSC <स्पेस> <सीट नंबर> आणि 57766 या नंबरवर पाठवू शकता, तसेच आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा डोकोमो आणि बीएसएनएल नेटवर्क धारकांनी MAH10<स्पेस> <रोल नंबर> टाइप करून 58888111 या नंबरवर पाठवावा.
या वेबसाईटवर पहा दहावीचा निकाल
1) www.mahresult.nic.in
2) www.result.mkcl.org
3) www.maharashtraeducation.com
4) www.rediff.com/exams
या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा सविस्तर निकाल पहायला मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या विषय निहाय ऑनलाईन निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल.
Leave a Reply