शिवसेनेचे प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर कचरा फेकून आंदोलन

 

कोल्हापूर: झूम प्रकल्पातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी करत शिवसेनेन प्रदूषण नियंत्रण महामंडळावर मोर्चा काढून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर कचरा फेकून निषेध नोंदवला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेच्या आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

कोल्हापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. कचऱ्याच्या प्रश्नामुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्यातच झूम प्रकल्पावरही कचऱ्याचे मोठे ढीग साठल्यामुळे या ठिकाणी धुराचे मोठ्याप्रमाणावर प्रदूषण होत आहे. या परिसरातील सुमारे 25 हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय. या कचरा व्यवस्थापनामध्ये महापालिका प्रशासन कमी पडत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं झूम प्रकल्पावर कचऱ्याची पूजा घालून मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवला होता. हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली होती. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शिवसेनेन आज झूम प्रकल्पावर आंदोलन करत प्रदूषण मंडळाचे अधिकारी अविनाश कडले आणि मनपा आरोग्य अधिकारी विजय पाटील यांना धारेवर धरलं. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी कचरा घेऊन थेट प्रदूषण नियंत्रण मंडळावर आपला मोर्चा वळवला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर कचरा फेकून निषेध नोंदवला. तसेच मनपा आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, रवी चौगले, कमलाकर जगदाळे, शुभांगी पोवार, सुजाता सोहनी, दिपाली शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!