
एक मुलगा आणि एक मुलगी हे केवळ चांगले मित्र असूच शकत नाही,’ हा संवाद मैने प्यार किया चित्रपटातमोहनीश बहलच्या तोंडी होता. असंच काहीसं स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत पहायला मिळतआहे. अनेक वर्षांपासून मित्र असलेले साकेत मीराला प्रपोज करणार का, साकेत आणि मीरा यांच्यातल्या नात्यालानाव मिळणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्टार प्रवाहवर ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत कथानक वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. मीरा आणिसाकेत लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. मैत्रीच्याही पलिकडचं असं त्यांचं नातं आहे. या नात्याला काहीनाव नाही. त्याच्या मनात मीराविषयी तसा काही विचार नाही. मीरासाठी कसा नवरा कसा हवा, हे आदित्यनेविचारल्यावर साकेत जे वर्णन सांगतो ते स्वतःचंच असतं. मीरासाठी स्थळं शोधली जात आहेत. त्यात मीराच्याआयुष्यात डॉ. ऋषिकेशचा प्रवेश होणार आहे. या सगळ्यानं साकेतच्या मनात चलबिचल वाढणार आहे. याचापरिणाम म्हणून साकेत मीराला प्रपोज करणार का, तिच्याशी लग्नाची तयारी दर्शवणार का आणि सगळ्यातमहत्त्वाचं, त्यांच्या नात्याला नाव मिळणार का, हे पहाणं रंजक ठरणार आहे.
मीरा आणि साकेत यांच्या नात्याविषयी जाणून घेण्यासाठी आवर्जून पहा ‘लेक माझी लाडकी’ सोमवार ते शनिवाररात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर !
Leave a Reply