
कोल्हापूर: सन 2017 चा ” राजर्षी शाहू पुरस्कार ” पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट चे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांनी केली.
यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने प्रतिवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस ” राजर्षी शाहू पुरस्कार ” प्रदान करण्यात येतो.
सन 2017 चा ” राजर्षी शाहू पुरस्कार ” पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विज्ञान क्षेत्रातील असामान्य कामगिरी बद्दल आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालू ठेवणारे एक ज्येष्ठ वयक्तिमत्व म्हणून आणि त्यांनी भारताच्या विकासात्मक वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणून देण्यात येणार आहे.
राजर्षी शाहू पुरस्कारचे स्वरुप हे रक्कम रु. 1 लाख, स्मृती चिन्ह व मानपत्र असे असून हा पुरस्कार राजर्षी शाहू जयंतीदिनी म्हणजे सोमवार दि. 26 जून 2017 रोजी सायंकाळी 6 वाजता मुख्य सभागृह, शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे समारंभपूर्वक श्रीमंत शहू छत्रपती महाराज यांच्याहस्ते व नामदार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आोयोजित कार्यक्रमामध्ये देण्यात येणार आहे.
दिनांक 21 जून 2017 ते 25 जून 2017 या कालावधीत राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्ताने पहिल्या दिवशी शाहीरी मुजरा व दिनांक 25 जूनपर्यंत विविध व्याख्यानांचा कार्यक्रम दररोज सायंकाळी 5.30 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
Leave a Reply