
कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संशयित आरोपी आणि सनातनचा साधक. समीर गायकवाड यांचा जामीन १७ जूनला येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले संमत केला होता. १९ जूनला न्यायालयात समीर यांच्या वतीने २ जामिनदारांची कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर. समीर गायकवाड यांची येथील कळंबा कारागृहातून कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी सुटका केली. या वेळी सनातनचे अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता आनंद देशपांडे, अधिवक्ता संदीप अपशिंगेकर आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. १७ जूनला समीर गायकवाड यांना जामीन मिळाल्यानंतर त्याचदिवशी जामिनदार देऊन कागदपत्रांची पूर्तता अपूर्ण राहिली होती. त्यामुळे समीर यांना जामीन मिळाला, तरी त्यांची कळंबा कारागृहातून सुटका झालेली नव्हती. समीर यांच्या वतीने सांगली जिल्हा तासगाव तालुक्यातील जामिनदार. दत्तात्रय पांडुरंग ऐडके (वय ४४ वर्षे, रा. वासुंबे) आणि. जगन्नाथ धोंडिराम पाटील (वय ५८ वर्षे, रा. निमणी नागाव) यांनी न्यायालयात जामिना संदर्भातील कागदपत्रे १९ जूनला सकाळी ११ वाजता सादर केली. त्यानंतर न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी २ जामिनदारांना ‘तुम्ही समीर यांना ओळखता का ? तुमचा जामीन ग्राह्य धरावा का ?’ असे विचारले. त्यानंतर सर्वश्री ऐडके आणि पाटील यांनी ‘आम्ही समीर यांना ओळखतो. आमचा जामीन ग्राह्य धरावा. जामीन देतांना न्यायालयाने दिलेल्या अटी आम्हाला मान्य आहेत’, असे सांगितले.
या वेळी न्यायाधीश बिले यांनी ‘तुम्ही समीर यांना त्या अटी समजावून सांगा’, असे सांगितले. न्यायालयातील कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर जामीन मिळाल्याविषयी न्यायालयाचा लकोटा (ऑर्डर) घेऊन तो कळंबा कारागृहात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता समीर गायकवाड यांची सुटका करण्यात आली.
Leave a Reply