
कोल्हापूर: कोल्हापूर डीस्ट्रीक पॅरलींपिक असोसिएशन कोल्हापूर या संस्थेच्या तीन दिव्यांग जलतरणपटूची प्रथमच ६ जुलै ते ९ जुलै दरम्यान जर्मनी येथील बर्लिन येथे IDBM स्विमिंग चॅम्पियानशीप २०१७ या स्पर्धेसाठी भारतीय पॅरा जलतरण संघात निवड झालेली आहे.भारतातून एकूण १६ दिव्यांग जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी होणार असून अंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू गोल्डन बॉय स्वप्नील पाटील याचाही यात समावेश आहे.अशी माहिती अध्यक्ष अमोल कोरगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.ज्युनिअर गटात आफीद अत्तार, प्रथमेश कापडे आणि सिनिअर गटात अभिषेक जाधव यांची निवड झाली आहे.या स्पर्धेत भाग घेऊन आक्टोंबर मध्ये होणाऱ्या चॅम्पियानशीपसाठी पात्रता वेळ आणि एशियन कॉमन वेल्थ स्पर्धेसाठी गुणवत्ता वेळ नोंदविणे गरजेचे आहे.यासाठी खेळाडूंना आर्थिक मदतीची गरज आहे तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी यात पुढाकार घ्यावा असे आवाहन असोसिएशनच्या वतीने केले आहे.यावेळी उपाध्यक्ष दिलीप कांबळे,अमोल पवार,संजय पाटील,रामचंद्र आरळेकर,राजेंद्र कोरणे यांच्यसह दिव्यांग उपस्थित होते.
Leave a Reply