
कोल्हापूर :काल आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना महापौर यांना निवेदन देण्यासाठी गेले असता महापौर यांच्या मुलाच्या काही समर्थकांनी वादावादी करत त्यांना मारहाण केली. याबद्दल आज आपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर मूक आंदोलन करत आपला निषेध नोंदविला. याबद्दल अधिक माहिती अशी की,दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतरित करण्याच्या ठरावावरून महापौर सौ. हसिना फरास यांच्या कार्यालयात आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांना काही नगरसेवक, नगरसेवकांचे नातेवाईक व कार्यकर्त्यांकडून सोमवारी दुपारी दरवाजा बंद करून धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. घटनेचे शूटिंग करणार्या ‘आप’च्या कार्यकर्त्याचा मोबाईल काढून घेण्यात आला. एका कार्यकर्त्याचा शर्ट फाडला. अश्लील शिवीगाळीही करण्यात आली. अखेर काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करून मारहाण करणारे नगरसेवक व ‘आप’च्या कार्यकर्त्यांना शांत करून बाजूला नेले.आज महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे.महापालिकेच्या दारात आपच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केले.काळ्या फिती तोंडाला बांधून अश्या प्रकारे महापालिकेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.तसेच ज्यांनी मारहाण केली या सर्व समर्थकांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. यावेळी नारायण पोवार, संदीप देसाई, नीलेश रेडेकर, जयवंत पोवार, नाथाजी पोवार, आप्पासो कोकितकर, उत्तम पाटील, एस्तेर कांबळे, भिकाजी कांबळे, विश्वनाथ शेट्टी, आनंदराव वणिरे, सद्दाम देसाई यांच्यासह कार्यकर्ते आज आंदोलनात उपस्थित होते.
Leave a Reply