रस्ते हस्तांतरण केल्यास महापौरांना काळे फासण्याचा तृप्ती देसाईंचा ईशारा

 

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेने रस्ते हस्तांतरण ठरावास मंजुरी दिली तर महापौर हसीना फरास यांना भूमाता ब्रिगेड काळे फासेल आणि या ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या नगरसेवकांना दारूच्या बाटल्या भेट म्हणून देऊ असा धमकीवजा ईशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यम यांच्यांशी बोलताना दिला.महापालिकेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.संपूर्ण महाराष्ट्रात दारू बंदीचे आंदोलन भूमाता ब्रिगेड करत आहे.या धर्तीवर दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतरण करण्याचा घाट महापौर यांच्यासह काही नगरसेवक यांनी घातला आहे.हा डाव मोडीत काढून ठराव मंजूर केल्यास महापौर यांच्या तोंडाला काळे फसू तसेच करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातून पुजारी हटाव मोहीम यालाही भूमाता ब्रिगेडचा संपूर्ण पाठींबा आहे.मागील वेळी तृप्ती देसाई महिलांच्या गाभारा प्रवेशाबाबत  मंदिरात आल्या होत्या तेंव्हा याच पुजाऱ्यांनी त्यांना मारहाण केली होती.सर्वच बाबतीत पुजाऱ्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!