
कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेच्या महासभेत मंगळवारी तब्बल तीन तासांच्या गोंधळानंतर वादग्रस्त रस्ते हस्तांतरणाचा ठराव 32 विरूध्द 47 अशा बहुमताने मंजूर झाला. सत्ताधारी पक्षांनी दाखल केलेला ठराव मंजूर होण्यासाठी शिवसेनेच्या चार नगरेसवकांनी पाठिंबा दिला.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ठराव मंजूर करण्यासाठी दोन कोटींची सुपारी घेतल्याचा आरोप केला. तर विरोधकांनी सद्या सुरू असलेल्या लिकर लॉबीकडून सुपारी घेतल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. सत्ताधारी व विरोधी भाजप-ताराराणी आघाडीतील नगरसेवकांच्या आक्रमतेमुळे धक्काबुक्की झाली. त्यामुळे अर्ध्या तासासाठी सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर ताराराणी आघाडीचे विलास वास्कर यांनी महापौर आसनासमोरील मानदंड उचलून पळविण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षातील नगरसेवकांनी प्रचंड विरोध केल्याने आणि सत्ताधारी पक्षातून त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाल्याने आरडाओरडामुळे सभागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
Leave a Reply