स्पॉट मेंबर्स ग्रुप “युवा सेना चषक” फुटबॉल स्पर्धेचा मानकरी

 

कोल्हापूर : युवा सेना अध्यक्ष मा.आदित्याजी ठाकरे यांच्या वाढदिवसाची पर्वणी साधून कोल्हापूर युवसेनेच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी युवा सेना चषक इनडोअर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेना अध्यक्षांच्या वाढदिवसाची निमित्त कोल्हापूर युवसेनेच्या वतीने आयोजित युवा सेना चषक फुटबॉल स्पर्धा २०१७ चा मानकरी स्पॉट मेंबर्स ग्रुपने ठरला. अंतिम सामन्यामध्ये जय भवानी ग्रुप संघावर त्यांनी सहज मात करून विजेता होण्याचा मान मिळविला.

युवसेनेच्या वतीने भव्य इन डोअर सिक्स बाय सिक्स फुटबॉल स्पर्धेचे आयोजन “महालक्ष्मी जिमखाना, दसरा चौक, कोल्हापूर” येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदविला, या संघाचे ८ गटामध्ये विभागणी करण्यात आली होती. या संघामधून बाद पद्धतीनी सामने दिवस-रात्र खेळविण्यात आले.

कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामास ब्रेक लागल्यानंतरही युवसेनेच्या वतीने आयोजित स्पर्धेस खेळाडूंसह प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. या स्पर्धेत कोल्हापूर शहरातील नामांकित खेळाडूंनी आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासह १९ आणि १७ वर्षाखालील गटातील खेळाडूंनीही आपले कौशल्य दाखवीत प्रेक्षकांची वाहवा मिळविली. तोडीस-तोड खेळ आणि आक्रमण-प्रतिआक्रमनाणी रंगलेल्या सर्वच सामन्यात खेळाडूंचे कौशल्यपणाला लागले. यामध्ये यामध्ये उत्कुष्ट खेळाचे दर्शन घडवीत जय भवानी ग्रुप, हर्षल सुर्वे “सी”, स्पॉट मेंबर्स आणि वेताळमाळ तालीम या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

पहिला उपांत्य सामना जय भवानी ग्रुप विरुद्ध हर्षल सुर्वे”सी” या दोन संघांमध्ये यांच्यामध्ये खेळविण्यात आला. पूर्णवेळ गोलशून्य बरोबरी राहिल्याने या सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आउट द्वारे लावण्यात आला. यामध्ये जय भवानी ग्रुपने हर्षल सुर्वे “सी” संघावर २ विरुद्ध १ अशा फरकाने विजय मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामना स्पॉट मेंबर्स विरुद्ध वेताल्माल तालीम यांच्यामध्ये खेळविण्यात आला. यामध्ये स्पॉट मेंबर्सने वेताळमाळ तालीम संघावर पेनल्टी शूट आउट मध्ये १ विरुद्ध ० अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा अंतिम सामना दोन तुल्यबळ संघात होणार असल्याने प्रेक्षकांनी मैदानावर गर्दी केली होती. एकीकडे जय भवानी संघाकडून शिवाजी तरुण मंडळाचे खेळाडू ऋतुराज पाटील, कपिल साठे, बालगोपाल तालमीचा खेळाडू सचिन गायकवाड अशा स्टार खेळाडूंचा भरणा होता. तर दुसरीकडे नवख्या स्पॉट मेंबर्स संघाचे खेळाडू होते. सामन्याच्या सुरवातीस शहराचे आमदार मा.राजेश क्षीरसागर आणि शिवसेना पदाधिकारी यांनी खेळाडूना शुभेच्या दिल्या. सामना अपेक्षेप्रमाणे अत्यंत अटातटीच्या झाला. पूर्वाधात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. ऋतुराज पाटील, कपिल साठे, सचिन गायकवाड या अनुभवी खेळाडूना स्पॉट मेम्बर्स ची बचावफळी भेदण्यात अपयश आले. पूर्वार्धात स्पॉट मेंबर्सच्या खेळाडूंनी बचावावर भर दिला. उत्तरार्धात सामन्याच्या सुरवातीस जय भवानी ग्रुपच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचत गोलची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. तर स्पॉट मेंबर्सच्या खेळाडूंनी त्याच ताकतीने बचाव करीत प्रतीआक्रमण करीत सामन्यात रंगत आणली. स्पॉट मेंबर्स च्या खेळाडूंनी शॉर्ट पासिंग वर भर देत आपला खेळ उंचावला यात त्याना पाहीले यश मिळाले. स्पॉट मेंबर्सकडून पहिल्या गोलची नोंद झाली. यानंतर जय भवानी संघाच्या समन्वयाच्या अभावाचा फायदा घेत स्पॉट मेंबर्सकडून दुसऱ्या गोलची नोंद झाली. यातून अनुभवी जय भवानी संघाचे खेळाडू दडपणाखाली खेळत राहिले. आणि स्पॉट मेंबर्सकडून आणखी दोन गोलची नोंद करून सामन्यात विजय मिळवीत युवा सेना चषकावर कब्जा केला.

यानंतर झालेल्या बक्षीस समारंभामध्ये आमदार मा.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते स्पॉट मेम्बर्स संघास युवा सेना चषक आणि रोख १५ हजार रुपये, उपविजेत्या जय भवानी ग्रुप संघास उपविजेता चषक व रोख ११ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक वेताळमाळ तालीम आणि हर्षल सुर्वे “सी” संघास प्रत्तेकी रु.७ हजार अशी बक्षिसे देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेस पंच म्हणून कामगिरी बजावणाऱ्या पंच सागर हुजरे यांचा सत्कार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करणेत आला.

यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, शिवसेनेचे जयवंत हरुगले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, संयोजन समितीचे ऋतुराज क्षीरसागर, युवा सेना शहर संघटक चेतन शिंदे, अविनाश कामते, पियुष चव्हाण, शिवसेना विभागप्रमुख कपिल सरनाईक, अजिंक्य पाटील, सौरभ कुलकर्णी, सार्थक खतोडीया, ओंकार परमणे, प्रशांत जगदाळे, शैलेश साळोखे यांच्या सह युवा सैनिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!