सोशल मिडीयावर पत्रकारांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाई करा;कोल्हापूर प्रेस क्लबची मागणी

 

कोल्हापुर : सोशल मिडीयावर पत्रकारांबद्दल अपशब्द वापरून दबाव आणणाऱ्यांचा शोध घ्यावा. त्यांना योग्यती समाज द्यावी, या मागणीसाठी कोल्हापूर प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना  निवेदन दिले. क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांच्या नेतृत्वाखाली हि भेट घेतली.  जिल्हाधिकारी सुभेदार आणि अधीक्षक मोहिते यांनी योग्य ती करवाई केली जाईल असे आश्वासन दिले.  वस्तुस्थिति सांगताना अध्य्क्ष लुमाकांत नलवडे यांनी सांगितले की अंबाबाई मंदिरातील श्रीपुजक आणि  विरुद्ध काही जनता असा वाद सध्या सुरु आहे.दिवसेंदिवस हा वाद चिघळत आहे.बुधवार (ता.२१) रोजी आयबीएन लोकमतचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी या विषयावर घेतलेल्या चर्चा सत्रा आयबीएनवर घडवून आणले होते. यानंतर रात्री १ वाजल्यापासून संदीप राजगोळकर यांनासोशल मिडीयावर अपशब्द वापरूनत्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांचा निषेध करा असा मेसेज सर्वत्र देण्यात आला आहे.कोणत्याही माध्यमातील पत्रकार हा प्रामाणिकपणे घडलेल्या घटनांचे वृत्तांकन करत असतो. त्याची काही संकुचित आणि चुकीच्या प्रवृत्तीचे लोक अपशब्द वापरून नाहक बदनामी करतात. हे चुकीचे आहे.याबद्दल आज कोल्हापुरातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि पोलीस अधिक्षक संजय मोहिते यांना निवेदन देण्यात आले. ज्याव्यक्तींचा असे मेसेज सोशल मिडीयावर दिले आहेत त्याचा शोध घ्यावा अशी मागणी यावेळी  पत्रकारांनी केली. यावर जिल्हाधिकारी सुभेदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना तात्काळ त्या व्यक्तीच्या शोध घेवून त्याला समज देण्यास सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष तानाजी पोवार,कार्याध्यक्ष अभिजित पाटील. संदीप राजगोळकर, पांडुरंग दळवी, पांडुरंग पाटील,  शीतल धनवडे, कृष्णात पुरेकर,शुभांगी तावरे, शीतल धनवडे, सतीश सरीकर समीर मुजावर, संभाजी थोरात,संपत नरके, ज्ञानेश्वर साळोखे, अनिल देशमुख, विनोद सावंत , सचिन सावंत, प्रथमेश कात्राट, प्रताप नाईक ,विजय केसरकर, आशिष आडिवरेकर, ओमकार धर्माधिकारी, रवी पाटील , विठ्ठल बिरंजे, मिथुन राज्याध्यक्ष, रवी कुलकर्णी, सतेज ओंधकर, सुनील काटकर, सुनील पाटील,बाळासाहेब कोळेकर, भूषण पाटील, प्रिया सरीकर, इंदुमती गणेश, शिवाजी साळोखे,श्रद्धा जोगळेकर, यांच्यासह सर्व प्रसारमाध्यमातील प्रतिनिधी , छायाचित्रकार उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!