
कोल्हापूर: शिक्षण क्षेत्रातील हाडाच्या शिक्षिका कै.विद्या जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य संघर्ष फौंडेशनच्यावतीने दरवर्षी सावित्री पुरस्कार दिला जातो.पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून यावर्षीचा पुरस्कार दिल्लीच्या हेमाली डाबी यांना देण्यात येणार आहे.त्या आय.ई.एस आहेत.तसेच त्यांची मुलगी टीना डाबी ह्या २०१६ मध्ये झालेल्या यु.पी.एस.सी परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या आहेत.त्या सध्या राजस्थान राज्यात जयपूर शहराच्या त्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम येत्या २८ जून रोजी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक दत्ता जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्रालयातील प्रधान सचिव श्याम तांगडे असणार आहेत.बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म सध्यस्थिती आणि वाटचाल याविषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.तसेच ज्येष्ठ विचारवंत सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया योगदान सध्यस्थिती व आव्हाने या विषयावर आणि लोकशाहीची दिशा व दशा या विषयावर डॉ.विनय काटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत.आणि सत्कारमूर्ती हेमाली डाबी या उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा व आयुष्याचा परिपूर्णतेकडील वाटचाल या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.असे डॉ.चारुशीला रुकडीकर यांनी सांगितले.तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला नागसेन जाधव,सिद्धार्थ जाधव,बाबासाहेब कांबळे उपस्थित होते.
Leave a Reply