
कोल्हापूर:विश्वशांती नांदावी, पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिके करपत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामळे न्यू शाहूपुरी येथील मस्जीद परिसरात यासीन मुजावर युवा मंचच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीत दुवा पठण करण्यात आले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबर चोरट्यांच्या टोळ्या पकडून नागरिकांना दिलासा देणारे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांचा मुस्लिम बांधवांनी सत्कार केला. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी रोजा सोडला.
न्यू शाहूपुरी फ्रेडस सर्कल, बालगणेश मित्र मंडळ, परिसरातील सर्व नागरिक व विविध मंडळांच्या वतीने न्यू शाहूपुरी, बेकर गल्ली येथील मस्जीद जवळ उभारलेल्या मंडपात गुरूवारी इफ्तार पार्टीचे आयोजन केले. मंडळाचे प्रमुख वासिम मुजावर यांनी प्रास्ताविक केले. महापौर हसीना फरास, नगरसेवक नियाज खान, माजी नगरसेवक आदील फरास यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्यारे जमादार, दिलावर पठाण, फिरोज सौदागर, इजाद शेख, जुबेर पठाण याच्यासह भागातील नागरिक हजर होते. थांबलेला पाऊस पुन्हा सुरू व्हावा, देशात सुजलाम सुफलाम व्हावे अशी प्रार्थना करण्यात आली
Leave a Reply