
कोल्हापूर: आज आषाढी एकादशीनिमित्त प्रती पंढरपूर असणाऱ्या श्री क्षेत्र नंदवाळ येथे हजारो भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. अतिशय सुंदर अशी श्री विठ्ठल आणि रखुमाईची पूजा बांधण्यात आली होती.हजारो वारकरी आणि भक्त यांनी पंढरपूरच्या वारीप्रमाणे पायी चालत जाऊन दर्शन घेतले.विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात हा दिंडी सोहळा पार पडला.पुईखडी येथे भव्य आणि नयनरम्य असा रिंगण सोहळा माउलींच्या पालखी समवेत पार पडला.महापौर हसीना फरास यांच्यासह मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले.यानंतर पालखी नंदवाळ येथे रवाना झाली.नंदवाळ इथे विठ्ठलाचे दर्शन घेतले की प्रत्यक्ष पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते.अशी आख्यायिका आहे.पायी चालत जाणाऱ्या वारकरी आणि भक्तांना वाटेत खिचडी,लाडू,केळी,दुध,चहा,पाणी यांची मोफत सोय करण्यात आली होती.आज याबाबतीत कोल्हापूर किती दानशूर आहे याचा प्रत्यय आला.एकूणच आषाढी एकादशीदिवशी अतिशय भक्तीमय वातावरणात पालखी रिंगण तसेच विठ्ठलाचे दर्शन सोहळा पार पडला.
Leave a Reply