
अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे,असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत.भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या ‘विठ्ठला’ला माणूसपण चुकलेलं नाही. किंबहुना त्यामुळेच विठ्ठलजनसामन्यांचा आपला देव आहे. भक्तांची ही माऊली आजही एकटीच विटेवर उभी आहे,त्याची अर्धांगिनी त्याच्याबाजूला,पण त्याच्या सोबत नाही, कारण रखुमाई रुसली आहे. या मागची गोष्ट विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्याप्रेमाची अनोखी कहाणी लवकरच ‘विठूमाऊली’ या मालिकेच्या रूपानं स्टार प्रवाहवर येत आहे. या मालिकेच्यामाध्यमातून प्रथमच सावळ्या विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पहायलामिळणार आहे.आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. आजवर पंढरीची वारी आणि इतरअनेक चित्रपटातून संतांना दिसलेलं विठ्ठलाचं रूप, विठ्ठलाची महती, विठ्ठलाचं प्रेम अशा कथा दाखवण्यात आल्या.मात्र, संतांच्या आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावणाऱ्या साक्षात विठ्ठलालाही नियतीचा फेरा चुकला नाही.विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्यात नेमकं काय घडलं, प्रेमात मत्सराचं किल्मिष कुठून आलं, रखुमाई विठ्ठलावररुसून बाजूला का उभी राहिली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या मालिकेत मिळणार आहेत. मालिकेतले कलाकारआणि इतर तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.संत, भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचं माणूसपण, त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचं वेगळेपणआहे. त्यासाठी ‘विठूमाऊली’ मालिकेबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
Leave a Reply