
कोल्हापूर : शासनाकडून जाहीर झालेल्या कर्जमाफीतील लाभार्थी शेतकरी आणि त्यांना मिळालेला शेतीकर्जाचा लाभ याचा फलक लावून प्रत्यक्ष आकडेवारी जाहीर करावी, या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा बॅंकेवर शिवसेनेवतीने ढोल बडवत मोर्चा काढण्यात आला.
राज्य शासनाने जाहीर केलल्या कर्जमाफीतील वारंवार निकष बदलल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे वतीने राज्यभरात आज साडेबारा वाजता एकाचवेळी मोर्चा काढण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेली ३४ हजार कोटीची कर्जमाफी ही फसवी आणि खोटी आकडेवारीची आहे. त्याचा लाभ मुठभर शेतकऱ्यांनाही मिळाला नाही, तरिही मुख्यमंत्री मात्र मोठमोठ्या वल्गना करत शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दाखवत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून या कर्जमाफीची आकडेवारी बॅंकानी फलक लावून जाहीर करण्याची गरज आहे. त्यासाठी बॅंकांना आठ दिवसाची मुदत दिली आहे, असे सांगितले.
विजय देवणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांचे देणेघेणे नसल्याने ती अशी फसवी कर्जमाफी जाहीर करत आहेत. यावेळी मुरलीधर जाधव यांनीही मार्गदर्शन केले. मोर्चानंतर शिवसैनिकांनी व्यवस्थापक गोरख शिंदे यांना देण्यात आले. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख सुजीत चव्हाण, बाजीराव पाटील, संग्राम कुपेकर, दुर्गेश लिंग्रस, महिला आघाडी प्रमुख शुभांगी पोवार, मंगलाताई चव्हाण, रिया पाटील, दिप्ती कोळेकर, स्मिता सावंत यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते.
Leave a Reply