
कणेरी: श्री क्षेत्र सिद्धगिरी गुरुकुल फॉउंडेशन कणेरी संचलित सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे युवती महिला वर्गासाठी खास परिपूर्ण आरोग्य तपासणी मार्गदर्शन उपचार शिबिराचे येत्या ३० जुलै पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. मठाधिपती परम पूज्य अद्दृश काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या विशेष सूचनेनुसार या शिबिराचे आयोजन केले आहे.
स्त्री वर्गाचे विविध आजार हिमोग्लोबिन चे कमी प्रमाण व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या गर्भाशय पिशवीचे आजार आणि मुख्यत्वाने गरोदर पणात घेणेची काळजी व सुरक्षित मातृत्व सल्ला प्रबोधन या विविध पैलूंनी या शिबिरात मार्गदर्शन व तपासणी केली जाणार आहे, तसेच आवश्यकतेनुसार व्यक्तीगत सल्ला हि दिला जाणार आहे. या मोफत शिबिराचा लाभ १८ ते ६० वयोगटातील युवती महिला घेऊ शकतात. गेली १० वर्ष स्त्री आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारे आणि सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये पूर्ण वेळ कार्यरत डॉ. जितेंद्रसिंग राजपूत (एम.डी. )आणि डॉ. सौ. रेशम राजपूत ( डी.जी.ओ.) हे यामध्ये तपासणी करून मार्गदर्शन उपचार करणार आहेत, याचा महिला युवतीने लाभ घ्यावा असे आहवन सिद्धगिरी हॉस्पिटलचे- प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे
Leave a Reply