
कोल्हापूर:महापालिकेने बसविलेले वर्षभर बंद असलेल्या वॉटर ATM ची पूजा करत आप ने केले आंदोलन कोल्हापूर महापालिकेचा गैरकारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. वर्षभरापूर्वी अत्यंत गवगवा करत माजी महापौरांनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांच्या सुविधेसाठी वॉटर डीस्पेनसिंग मशीनचे उद्घाटन केले होते, परंतु हे मशीन गेले अनेक महिने बंद अवस्थेत आहे.महापालिकेमध्ये यासंबंधीे चौकशी केली असता तेथील विभाग जवाबदारी झटकत असताना दिसून येतात. परिसरातील छोट्या व्यापाऱ्यांच्या मते संबंधित वॉटर ATM सुरु झाल्यापासून अवघ्या 2-3 महिन्यातच बंद पडले कारण महापालिकेच्या संबंधित विभागाने लाईट बिल भरलेले नाही.एखादी सुविधा सुरु करायची आणि नंतर तेथील यंत्रणेकडे दुर्लक्ष करायचे ही पद्धत महापालिकेमध्ये बरेच वर्ष रूढ आहे.आम आदमी पार्टी (आप) ने हा गैरकारभार उघड केला असून संबंधित वॉटर ATM ची पूजा करत आंदोलन केले आहे. पुढील 4 दिवसात जर वॉटर ATM भाविकांच्या उपयोगासाठी सुरु केले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा ‘आप’ इशारा देत आहे.
Leave a Reply