
कोल्हापूर: फ्रेश न्यू लूक आणि फुल टू कॉमेडी कथासूत्र यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला ‘काय रे रास्कला’ हा चित्रपट उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आय गिरिधरन स्वामी यांनी केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटांसाठी छायाचित्रदिग्दर्शनाचं काम पाहणाऱ्या गिरिधरन स्वामी यांचं दिग्दर्शनाचं स्वप्न प्रियंकाच्या काय रे रास्कला या चित्रपटाद्वारे 47 व्या वर्षी पूर्णत्वास आलं. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वत:साठी थोडासा वेळ काढून, सर्व टेन्शन्स बाजूला ठेवून पोटभर हसवण्यासाठी गिरिधरन स्वामी यांची फौज सज्ज झाली आहे.
I.T.U.S (इसकी टोपी उसके सर) ची डिग्री घेतलेला राजा म्हणजेच गौरव घाटणेकर आपल्या या कलेचा वापर सगळ्यांना ठगवण्यासाठी कसा करतो आणि त्यात गुड्डू म्हणजेच मास्टर
निहार गीते ची त्याला लाभलेली साथ…त्यात राजा आणि वैजयंती म्हणजेच भाग्यश्री मोटे यांचा रोमान्स या चित्रपटात पाहता येणार आहे. मराठमोळ्या या चित्रपटात दक्षिणी तडका आपल्याला अनुभवता येणार आहे. प्रसंगानुरूप घडणारे विनोद धकाधकीच्या आयुष्यात एक छोटासा ब्रेक आपल्या देऊन जाणार आहेत. या विनोदी चित्रपटात गौरव, भाग्यश्री आणि निहार यांच्या मॅड कॉमेडीला निखिल रत्नपारखी, सुप्रिया पाठारे, नागेश भोसले, अक्षर कोठारी, ऐश्वर्या सोनार, श्रीकांत मस्की या कलाकार मंडळींची साथ लाभली आहे.आज कोल्हपुरात सर्व चित्रपटाच्या टीम ने प्रसारमध्यमांशी मनमोकळा संवाद साधला.

व्हेंटिलेटरच्या हृदयस्पर्शी गाण्यानंतर रोहन-रोहन ह्या संगीतकार जोडीने ‘काय रे रास्कला’ चित्रपटातून धमाल मस्ती आणि रोमँटिक गाणी आपल्यासमोर आणली आहेत. जय अत्रे लिखित “चेहरा तुझा कोहिनूर…” हे सोनू निगम च्या आवाजातील गाणं तर मोनालिसा मी महाराष्ट्राची हे सावनी रविंद्र च्या आवाजातील गाणं सर्वांना बेभान करून जातं. तर दुसरीकडे शान च्या मस्तीभऱ्या आवाजातील “यारी” हे दयासागर वानखेडे आणि राहुल साळवे लिखित मैत्रीच्या तालावर झुलवणारे हे गाणे सर्वांच्याच जुन्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देतं.
तर दाक्षिणात्य कॉमेडीचा हा मराठी तडका आजमावायला आणि रोहन रोहन च्या संगीताचा आस्वाद घ्यायला नक्की बघा काय रे रास्कला.
Leave a Reply