
नितीन केणी यांसारखे मात्तबर व्यक्तीमत्व ज्यांना मराठी सिनेमाची दूरदृष्टी आहेच, याच बरोबर मराठी सिनेमा मास आणि क्लास परंतू कसा पोहोचवायचा याची अगदी योग्य जाण आहे. जतीन वागळे दिग्दर्शित ‘मांजा’ हा सायकॉलॉजिकल थ्रीलर असावेगळ्या धाटणीचा चित्रपट नितीन केणी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. नुकताचया चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. प्रेक्षकांनी,समीक्षकांनी तसेच कलाकारांनी देखील ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला. मराठी कलाकारांनी सोशल मीडीयावर ट्रेलर सोबतच सुमेध आणि रोहीतचे देखील कौतुक केले आहे. कीशोरवयीन मुलं मित्रांच्या प्रभावाने लगेच कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ शकतात. मात्र, जर त्यामध्ये एखाद्या चुकीच्या संगतीची भर पडली तर प्रश्न आणखी गंभीर व धोकादायक बनू शकतो याच गोष्टीवर भाष्य करणार्या चित्रपट मांजा मध्ये अभिनेत्री अश्विनी भावे, सुमेध मुद्गलकर,रोहीत फाळके प्रमुख भूमिका निभावत आहेत.डान्स इंडीया डान्सव डान्स महाराष्ट्र डान्स या रिऍिलटी शोची पाश्वर्भूमी
असलेला सुमेध मुद्गलकर हा पहील्यांदाच मांजा चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रमुख भूमिकेत पदापर्ण करतोय. चित्रपटाचा ट्रेलर पाहता, सुमेधच्या पात्राची तुलना डर मधील शाहरुख खानच्या भूमिकेशी करण्यात येत आहे. सुमेध म्हणजेच विकी हा खूप शातीर, एक्सट्रोव्हटर् आणि तल्लख बुद्धीचा असा मुलगा तर जयदीप म्हणजेच रोहीत फाळके साधा सरळ आणि अबोल पात्र साकारताना दिसतो. विकी आणि जयदीप या दोन्ही पात्रांच्या स्वभावात आवजुर्न विरोधाभास जाणवतो. जयदीपच्या आईच्या भूमिकेत अश्विनी भावे दिसणार आहेत. आपला मुलगा मित्राच्या संगतीत काही चुकीच्या गोष्टी तर करत नाही आहे ना? जयदीपला त्याचा मित्र विकी ब्लॅकमेल तर करत नाही आहे ना? अशा बर्याच चिंतांनी घेतलेली आई, तिच्या या चिंता खर्या ठरतात का? असे बरेच प्रश्न ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनात काहूर निमार्ण करतात. विकी-जयदीप-त्याची आई या त्रिकोणातला हा मनोविकृतीवर आधारित लपंडाव कसा रंगतो ते चित्रपट पाहूनच कळेल. बॉलीवूड क्षेत्रात कायर्रत असलेले तंत्रज्ञ – फसाहत खान, अलोक डे, बेयलॉन फॉंसेका, चारूश्री रॉय, शैल प्रीतेश,अनुराग सैकिया, प्रद्युम्न कुमार स्वैन, लॉंजिनस फर्नांडीस आणि अपूर्व अरोरा, डेंझल स्मिथ, शिवानी टांकसाळे, मोहन कपूर या कलाकारांचे मांजा या चित्रपटात मोलाचे योगदान आहे.त्रिलोक मल्होत्रा आणि के आर हा निर्मित हा चित्रपट २१ जुलैला जागितक पातळीवर प्रदर्शित होणार आहे. नितीन केणी आणि मनीष विशिष्ठ यांचा MFDC या कंपनी अंतगर्त प्रस्तुतकतार् म्हणून ‘मांजा’ हा पहीलाच मराठी चित्रपट आहे.
Leave a Reply