
कोल्हापूर: कोल्हापूर हे कलापूर म्हणून प्रसिद्ध आहेच त्याचबरोबर कोल्हापूरची खाद्य संस्कृती देखील जगात प्रसिद्ध आहे.त्यामुळेच यात भर घालण्यासाठीच हेवन पिझा कॅफे घेऊन आले आहेत पिझा आणि त्याचबरोबर काही रुचकर पदार्थ. पिझा हा परदेशी पदार्थ पण त्याच्या रुचकर आणि स्वादिष्टपणामुळे आज भारतीय लोकांच्यात पिझा हा पदार्थ कमी वेळेत अतिशय लोकप्रिय झाला.मुळचा इटली या देशात जन्म घेतलेल्या पिझाने आपले साम्राज्य जगभरात वाढविले. मग भारतीय खवय्ये तर यात मागे कसे रहातील.आज पिझा बनविणारे अनेक परदेशी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चेन स्वरुपात भारतातील लहान मोठ्या शहरात दिसतात.पण पिझा हा मध्यम आणि गरीब लोकांना कधीच न परवडणारा पदार्थ राहिला.त्यामुळे फक्त उच्चभ्रू लोकच पिझा खाण्यासाठी अश्या रेस्टॉरंट मध्ये गर्दी करायचे.पण कोल्हापुरातील एका तरुण उद्योजकाने या सर्व गोष्टी मोडीत काढत स्वतःचे पिझा कॅफे सुरु केले.पिझा हा पदार्थ परदेशी रेस्टॉरंटमध्ये ज्या किमतीत मिळतो त्याच्यापेक्षा अतिशय कमी आणि सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असा पिझा पण तीच टेस्ट आणि गुणवत्ता ठेवून देता येतो हे सिद्ध करून दाखविले ते कोल्हापुरातील प्रवीण चौगुले यांनी.
प्रवीण चौगुले यांनी याबद्दलचे आवश्यक संपूर्ण शिक्षण मुंबईला जाऊन घेतले.आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आज कोल्हापुर शहरात चार पिझा कॅफे सुरु केले आहेत.सर्वात प्रथम त्यांनी राजारामपुरी येथे ३० रुपये इतक्या कमी किमतीत लोकांना पिझा द्यायला सुरुवात केली.सर्वसामन्यांना महाग वाटणारा पिझा आता त्यांच्या बजेटमध्ये त्यांना खायला मिळू लागला.पिझा खाणे हे पूर्वी हाय सोसायटीतील खाणे समजले जायचे पण प्रवीण चौगुले यांच्या हेवन मधील परवडणाऱ्या पिझामुळे शहरातच उपलब्ध असलेल्या काही परदेशी चेन रेस्टॉरंटचे धाबे दणाणले.२०० ते २५० रु चा पिझा ३० रूला मिळू लागल्याने लोकांची हेवन मध्येच गर्दी वाढू लागली पण यामुळे प्रवीण चौगुले यांना व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.पण त्यांनी हार न मानता आपले कॅफे सुरूच ठेवले.आणि आज राजारामपुरी,शाहू मैदान,ताराबाई पार्कसह शाहूपुरी बी.टी कॉलेज येथील हेवन कॅफेत पिझा खाण्यासाठी कोल्हापूर तसेच बाहेरून अनेक खवय्ये गर्दी करत आहेत.
पिझा याचबरोबर बर्गर,फ्राईज,कॉफी,कडबी,मिल्क शेक या पदार्थांचीही चव अतिशय उत्कृष्ट आहे. याही पदार्थांना लोकांकडून खूप मागणी आहे.व्हेज चीझ पिझा,चीझ बस्ट,जैन पिझा,इटालियन पिझा अशी पिझामध्ये नाविण्यपूर्ण व्हरायटी ‘हेवन’मध्ये उपलब्ध आहे.काही ठिकाणी जागेची उपलब्धता नसल्याने ताराबाई पार्क येथील कॅफे हे व्हॅन स्वरुपात आहे.व्हॅन मध्ये अत्याधुनिक किचनची निर्मिती केली आहे.डॉमिनोझ,पिझा हट,मॅकडॉनल्डच्या धर्तीवर आधुनिक यंत्रणा बसविली आहे.चारही शाखांमध्ये सायंकाळी ४ ते १० या वेळेत खवय्ये याचा आस्वाद घेत आहेत.अशी माहिती हेवन पिझाचे सर्वेसर्वा प्रवीण चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.प्रवीण चौगुले यांनी स्वतः तर याचे शिक्षण घेतलेच पण अनेक तरुणांना यात शिक्षित करून त्यांना रोजगार मिळवून दिला आहे.आज त्यांच्या चारही शाखात १२ तरुण काम करत आहे.पिझासह सर्वच पदार्थांची चव,गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट असते.तसेच किंमत कुणालाही परवडेल अशीच आहे. या व्यवसायाबरोबरच याच्या अनुषंगाने प्रवीण चौगुले यांनी सोडा मशिन व्हॅन सुरु केली आहे.अश्या पद्धतीने आताच्या तरुण नवोदित उद्योजकांना या क्षेत्रात यायचे असेल तर हेवन पिझाची फ्रांचाईजी देण्यास आहोत त्यांनी हा व्यवसाय करून स्वावलंबी बनावे तसेच कोल्हापूरसह देशभरात हा व्यवसाय वाढवण्याचा प्रवीण चौगुले यांचा मानस आहे.
पूर्वी पिझा खाणे हे स्टेटस समजले जायचे पण सर्वसामन्यांना परवडणारा पिझा बाजारात उपलब्ध झाल्याने सर्वसामान्यांचे स्टेटस मात्र नक्कीच उंचावले आहे यात शंका नाही.पत्रकार परिषदेस नारायण राजपूत,धोंडीराम कुंभार, अनिल वणारे,अमोल भोसले,उत्तम चौगुले,प्रवीण मरणहोळकर आणि राजेंद्र सुतार उपस्थित होते.
Leave a Reply