
कोल्हापूर: सुकाणू समितीच्यावतीने आमदार बच्चू कडू आणि जयंत पाटील यांनी कर्जमाफीचा ठराव मांडला ,कर्जमाफी देणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पण अद्याप ती मिळाली नाही.४०० वर्षापूर्वी मोघल,दिडशे वर्षापूर्वी ब्रिटीश आणि आता सरकार यांनी लोकांवर फक्त अन्यायच केला आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या सरकारचे हात रक्ताने बंबाळले आहेत अश्या सरकारला १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदन करू देणार नाही असा ईशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.१४ ऑगस्ट ला प्रथम रास्ता रोको आणि मग पालकमंत्री यांना १५ ऑगस्ट ला जिल्हाधिकारी कार्यालय येथे झेंडावंदन करू देणार नाही.
कर्जमाफीसाठी सरकार शेतकरी यांच्याकडून अर्ज मागवत आहे.कर्जमाफी ही बँकांनी द्यायची आहे.सरकार स्वतःच्या पदरचे देत नाही.जनतेचाच पैसा देत आहे.दानशूर असल्याचा आव सरकारने आणू नये.सरकारनेच योग्य भाव न दिल्याने ही कर्जमाफी द्यावी लागत आहे.मुख्यमंत्री कुणावर उपकार करत नाहीत,अर्ज मागवून शेतकऱ्याला दिन दुबळे वाटावे अश्या भूमिकेत सरकारने त्यांना आणू नये. असेही ते म्हणाले
Leave a Reply