राजाराम कारखान्याचे महाडिक गटाचे पात्र सभासद ठरले अपात्र; आ.सतेज पाटील यांची माहिती

 

कोल्हापूर : प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी दिलेल्या निकालानुसार राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र झाले. यामुळे महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. या सभासदांनी मतदानाचा हक्क पात्र सभासद समजून बजवलेला आहे. आज आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यामध्ये महाडिक कुटुंबातील १० सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, आमदार सतेज पाटील गटानं ही निवडणूक बेकायदेशीर असून फेर निवडणुक घ्यावी अशी मागणी केली आहे.राजाराम कारखान्याच्या सभासद यादीवरून मोठ राजकारण पेटलं होत. निवडणुकीच्या काळात सत्तेचा गैरवापर करून अपात्र सभासदांना पात्र ठरविण्यात आले होत. आज प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्या समोर सुनावणी झाली. यामध्ये राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र झाले असून शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील १० जणांचा यामध्ये समावेश आहे. आमदार सतेज पाटील गटाच्या बाजूनं निकाल लागला आहे. सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये एकूण १२३३६ इतके मतदान झाले. त्यामध्ये या अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता. म्हणजे नियमित ११००० सभासदांचे मतदान झाले होते. यापैकी ५००० ते ५५०० मते आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता हे सिध्द झालं आहे. या अपात्र सभासदांमुळे आमच्या उमेदवारांना १२०० ते १२५० मतांच्या फरकानं पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते, तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता आली असती. अखेर सत्य काय ते समोर आले आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!