कोल्हापूर/प्रतिनिधी : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीने नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांचा पदग्रहणसमारंभ तसेच कोल्हापुरातील जेष्ठ बांधकाम व्यावसायिकांना जीवन गौरव पुरस्कार अर्पण आणि उत्कृष्ठ वास्तू निर्मिती पुरस्कार प्रदान समारंभ येत्या रविवारी दि. ८ जून रोजी सायंकाळी ५ वा. रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून समारंभास प्रमुख पाहुणे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, .खा. धनंजय महाडिक उपस्थित राहणार आहेत. शिवाय कार्यक्रमास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, स्टेट चेअरमन जगनाथ जाधव व क्रीडाई उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे माजी चेअरमन राजीव लिंग्रस यांनी पत्रकार परिषदेत दिली.बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे नूतन चेअरमन विजय कोंडेकर,व्हाइस चेअरमन अमोल कुलकर्णी,जी,सी,मेंबर प्रताप बापू कोंडेकर, मदन भंडारी आदी उपस्थित होते.या नव्या पदाधिकारी व कार्यकारणीच्या पदग्रहन समारंभाबरोबरच बांधकाम क्षेत्रात आपल्या अतुलनीय कर्तुत्वाने नावलौकिक कमवलेले व कोल्हापूर शहराच्या जडणघडणीचे पहिले शाहूकालीन आर्कीटेक्ट कै. रामराव नागेशकर ज्यांनी राधानगरी धरण, शालिनी पॅलेस, संपूर्ण राजारामपुरीची रचना व बऱ्याच महत्वाच्या वास्तूंचे रचनाकार म्हणून केलेल्या कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्राशी निघडीत व आधुनिक बांधकाम साहित्य चे शिल्पकार सुरेश गुळवणी यांना जीवनगौरव पुरस्कार त्याचबरोबर उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार शंकर पाटील व संजय चव्हाण यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उज्वल नागेशकर व अशोक रोकडे यांना “जीवन-दूत” हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply