डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा वर्ल्ड ट्रेड सेंटरशी सामंजस्य करार

 

मुंबई:डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे व वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.या करारांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार, सप्लाय चेन मॅनेजमेंट, आयात निर्यात वरती आधारित विविध पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालिका आकृती बागवे, प्रिया पानसरे, संतोष कोत्रे व तृप्ती चक्रवर्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्ल्ड ट्रेड सेंटर हे एक प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे जो धोरणकर्ते, जागतिक व्यावसायिक आणि विकास संस्थांना एकत्र आणण्याचे कार्य करते. वर्ल्ड ट्रेड इन्स्टिट्यूट हे शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना जोडण्याचे कार्य करते तसेच विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोन आणि औद्योगिक भविष्यासाठी व्यावहारिक कौशल्ये प्रदान करते.यावेळी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व डॉ. जे. ए. खोत यांचे सहकार्य लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!