ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम

 

कोल्हापूर : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची स्थापना १९३६-३७ मध्ये झाली. ज्या विद्यालयाचे ८ हजारांहून अधिक सेवा केंद्र व ५ हजारांहून अधिक पाठशाळा आहेत. या विद्यालयाला ९० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने कोल्हापूर शहर व परिसरात ५० हून अधिक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पेठ वडगांव, बांबवडे, इचलकरंजी येथे भव्य शिवलिंग आणि फुलांची सजावट करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील सेवा केंद्राच्या प्रमुख संचालिका बी. के. सुनंदा बहेनजी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. “आपल्या कार्याची ९० वर्षे पूर्ण करीत असल्यामुळे विद्यालयाने विविध क्षेत्रातील भाऊ-बहिणींची सेवा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच महिला संघटन, युवा वर्गासाठी विविध कार्यक्रम महाशिवरात्री उत्सव निमित्ताने आयोजित केले आहेत. असेही सुनंदा बहेनजी यांनी सांगितले.

 

महाशिवरात्री महोत्सवानिमित्त होणारे स्थानीय कार्यक्रम :

११ फेब्रुवारी आर. के. नगर परिसर शोभायात्रा.

१२ फेब्रुवारी – शिवाजी पेठ, शोभा यात्रा किसान मेळावा, कळे.

१३ फेब्रुवारी – गडमुडशिंगी, शोभायात्रा.

१४ व १५ फेब्रुवारी – संपूर्ण शहरामध्ये महाशिवरात्रीचे रहस्य स्पष्ट करणारे पर्चे वाटप व अनाउन्समेंट.

संगीत संध्या १७ फेब्रुवारी कार्यक्रमामधून महाशिवरात्रीचे माहात्म्य राज्योपाध्ये नगर.

१८ फेब्रुवारी – नेर्ली, तामगाव, शोभायात्रा. विकासवाडी परिसर,

पत्रकार परिषदेस रघुनाथ भाई, प्रतिभा बहेनजी, कीर्ती बहेनजी श्वेता बहेनजी उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!