सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात ९ फेब्रुवारीला रंगणार सूरमिलन सांस्कृतिक कार्यक्रम

 

कोल्हापूर:लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारत भारती संस्थेच्यावतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता राम गणेश गडकरी सभागृह, कोल्हापूर, येथे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. याप्रसंगी शहरातील विमला गोएंका इंग्लिश मिडीयम, हायस्कूल आणि न्यू हायस्कूल, कोल्हापूर, या विद्यालयाचे नृत्य तसंच स्वरसाक्षी ग्रुप चे संचालक अतुल दिवे यांचे गायनाचे सादरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती या कार्यक्रमाच्या संयोजिका मिनाक्षी गिरीधारी यांनी दिली.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिडशेव्या जयंतीचं औचित्य साधून भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. भारत भारती संस्थेच्या आयोजनातून हा कार्यक्रम होत आहे. सोमवार ९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता एस एम लोहिया हायस्कूल शेजारी राम गणेश गडकरी हॉलमध्ये हा सोहळा रंगणार आहे. सुरमिलन या कार्यक्रमांतर्गत शहरातील काही शाळांचे विद्यार्थी देशभक्तीपर नृत्य सादर करणार आहेत. त्यामध्ये शहरातील विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल आणि न्यू हायस्कूलचे विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणार आहेत. तर स्वरसाक्षी ग्रुपचे संचालक अतुल दिवे हे देशभक्तीपर गीतांची मैफिल सादर करणार आहेत. वादकांच्या सोबतीने दिवे हे विविध देशभक्तीपर गीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून सिनेअभिनेते अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सुमारे अडीच ते तीन तास हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून, या सोहळयाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले जाणार आहे, अशी माहिती आयोजक मिनाक्षी गिरीधारी आणि अतुल शेवडे यांनी दिली.

Comments are closed.

error: Content is protected !!