कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना प्रगतशील करण्याचे काम सरकार करत आहे.शहरातील सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या तर लोकांचे स्थलांतर थांबेल आणि शेतीची प्रगती होईल.शिवाय एआय ही जादू आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता एआय मध्ये असल्याचे उद्गार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभप्रसंगी काढले.यावेळी प्रास्ताविकपर बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलेल्या टिपू सुलतान बद्दलच्या वक्तव्याचा ही खरपूस समाचार घेतला.आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याशी इथले स्थानिक नेते काँग्रेसचे नेते आणि खासदार सहमत आहेत का याचं त्यांनी जाहीर रित्या उत्तर द्याव असे आव्हान ही खासदार महाडिक यांनी यावेळी दिले. आणि जोपर्यंत सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रवेश दिला जाणार नाही असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतीसाठी विविध योजना आणल्या जात आहेत किसान योजना आहे याचा १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. साडेचार लाख करोड रुपये या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले गेले आहेत असे सांगितले अनेक योजनांच्या माध्यमातून २७ प्रकारचे व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे.शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोअरेजसाठी ९० टक्के सबसिडी दिली गेली आहे त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.समारोपप्रसंगी विशेष अतिथी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय धांतुडे ,उपमहापौर अनिल डाळ्या यांची उपस्थिती होती.त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
