मुंबई : आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस आता 10 वर्षांच्या लाइफ कव्हर पर्यायासह उपलब्ध आहे. ही योजना अशा ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांच्यावर गृहकर्ज, मुलांचे शिक्षण आणि व्यावसायिक कर्जे अशा जबाबदाऱ्या आहेत. यामुळे, ज्या काळात आर्थिक जबाबदाऱ्या सर्वाधिक असतात, त्या काळात ग्राहकांना कमी प्रीमियममध्ये चांगले लाइफ कव्हर निवडणे या योजनेमुळे शक्य होते.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सचे वितरण प्रमुख भरत गुंटी म्हणाले, “जीवनातील ध्येयांनुसार ग्राहकांच्या आर्थिक संरक्षणाबद्दलच्या अपेक्षा सातत्याने बदलत आहेत. आर्थिक प्रवासाच्या विविध टप्प्यांवर ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचे रक्षण करण्यास मदत करणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस हा आमचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन दर्शवतो. यात 10 वर्षांची मुदत पॉलिसी असून, किफायतशीरपणा आणि महत्त्वपूर्ण आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी तयार केलेली वैशिष्ट्ये यांचा मेळ साधला जातो.ग्राहकांना असाध्य आजाराचे निदान झाल्यास आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस अंतर्गत विम्याच्या रकमेइतकेच 100% संरक्षण मिळते. विशेष म्हणजे, या योजनेत गंभीर आजारांपासून संरक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे, ज्यासाठी ठरावीक रकमेचा प्रीमियम आकारला जातो आणि त्यात दरवर्षी वाढ होत नाही. या योजनेत 67,100 रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य सेवांचाही समावेश आहे, तसेच 3 लाख रुपयांपर्यंतची क्लेमची रक्कम ग्राहकांना त्वरित दिली जाते.या व्यवसायातील 99.3%च्या यशस्वी क्लेम सेटलमेंट रेशोसह आणि Q1-FY2027 मध्ये सरासरी 1 दिवसाच्या क्लेम सेटलमेंट टर्नअराउंड वेळेसह, ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जेव्हा आमची सर्वाधिक गरज असते, तेव्हा आम्ही नेहमी त्यांच्यासोबत असतो.आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत (Q1-FY2027), कंपनीने 1,306 कोटी रुपयांचे मृत्यू-विषयक दावे निकाली काढले आणि मॅच्युरिटी व सर्व्हायव्हल बेनिफिट्स (मुदतपूर्ती व अन्य लाभ) म्हणून 3,360 कोटी रुपयांची रक्कम अदा केली; यावरून पॉलिसीधारकांना वेळेवर आर्थिक संरक्षण आणि मानसिक स्वास्थ्य प्रदान करण्यावर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफचा निरंतर भर दिसून येतो. याव्यतिरिक्त, आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीने 5,149 कोटी रुपयांचे मृत्यू-विषयक दावे निकाली काढले आणि मॅच्युरिटी तसेच सर्व्हायव्हल बेनिफिट्स अंतर्गत 15,363 कोटी रुपयांची रक्कम देऊ केली.”
