गांधीनगर पाणी योजनेसाठी महिलांचा जनआक्रोश घागर मोर्चा

 

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १३ गावांच्या जिव्हाळ्याची गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामाविरोधात आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. राजकारणाच्या हेतूने पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत प्रश्नांमध्ये खोडा घालणाऱ्या महायुती सरकार आणि मेघा इंजिनियरिंगविरोधात १३ गावातील नागरिकांनी जोरदार आवाज उठवला. महिला भगिनींनी मेघा इंजिनीयरिंगच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जून २०२७ पर्यंत काम पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन मेघा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले.या मोर्चामध्ये जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, सुदर्शन खोत, संग्राम पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील (चुयेकर), जिल्हा बँक संचालक स्मिता गवळी, पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, शिल्पा हजारे, अनिता कांबळे, संगीता यादव, सरपंच उत्तम आंबवडे, मधुकर चव्हाण, निशांत पाटील, चंद्रकांत डावरे, ए व्ही कांबळे, प्रियंका पाटील, रूपाली कुसाळे, सुमन गुरव, शुभांगी अडसूळ, अश्विनी शिरगावे, राधिका खडके, जहीदा इनामदार, शैलजा भोसले, प्रताप चंदवानी, बाबासो माळी, आशिष पाटील, युवराज गवळी,सुनील शिंदे, अमर मोरे, अरुण पाटील टोपकर, विनोद हुजूरानी, कीर्ती मसुटे, रावसाहेब पाटील, सचिन देशमुख, महेश जाधव, सुदर्शन पाटील, के. डी. माने, नायकू बागणे, दत्ता भिलुगडे, संग्राम पोवाळकर, सतिश निर्मळ, ऋषिकेश हुन्नुरे आदींसह महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!