जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सची नवी शॉर्ट फिल्म ‘द गोधडी इफेक्ट’

 

मुंबई:महाराष्ट्रातील प्रसिद्ध दागिन्यांचा ब्रॅंड जगन्नाथ गंगाराम पेडणेकर (जेजीपी) ज्वेलर्सने ‘द गोधडी इफेक्ट’ ही मराठी शॉर्ट फिल्म सर्वांसाठी आणली असून या भारतीय संस्कृतीतील जिव्हाळ्याची नाती दर्शवणारी ही कथा आहे.जितेंद्र जोशी, मधुराणी गोखले, सई गोडबोले आणि प्रदीप वेलणकर या मराठी कलाकारांनी यात काम केलं असून जुन्या व प्रेमाची ऊब असलेल्या साड्यांपासून बनवलेल्या गोधडीवरून ही गोष्ट प्रेरित आहे. आठवणी नवं रूप घेतात, पण त्या पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात, हेच ही कथा सांगते.

याच कलाकारांना घेऊन जे.जी.पी. ज्वेलर्सने बनवलेली ही दुसरी कॅम्पेन आहे. या आधी ‘द रिझल्ट’ या सणासुदीच्या फिल्ममध्ये आजच्या कुटुंबातील समानतेबद्दल बोललं गेलं होतं, आणि प्रेक्षकांची कौतुकाची दाद ही मिळाली होती. रोजच्या आयुष्यातील साध्या व अर्थपूर्ण गोष्टींमधून हा ब्रँड लोकांशी नातं जोडत आहे. जुने दागिने म्हणजे फक्त जपलेल्या आठवणींपर्यंत मर्यादित नसून नवीन आठवणी बनवण्याची एक संधीही आहे.

या कॅम्पेनबद्दल बोलताना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर (जेजीपी) ज्वेलर्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर आसावरी पेडणेकर म्हणाल्या, “प्रत्येक दागिन्याची स्वतःची एक गोष्ट असते – त्यात सण, नाती आणि पिढ्यांपिढ्या टिकणाऱ्या आठवणी असतात. ‘द गोधडी इफेक्ट’मधून आम्हाला या भावना साजऱ्या करायच्या आहेत, आणि लोकांना गोल्ड एक्स्चेंज ला नव्या नजरेने बघायला सुचवायचं आहे. अद्भूत ह्या आमच्या ब्रॅंड एजन्सिने हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळला आहे.”

ही फिल्म आपण इथे पाहू शकता: https://www.youtube.com/watch?v=AoZlVS76bqA

 

Comments are closed.

error: Content is protected !!