प्रतिकूल हवामान आणि ट्रॅव्हल इन्श्युरन्स : ‘ट्रिप इंटरप्शन’ साठी नेमके कोणते संरक्षण? राकेश कौल (चीफ डिस्ट्रीब्यूशन ऑफिसर – रिटेल बिझनेस)

 

सुट्ट्यांचे नियोजन करताना नेहमीच खूप उत्साह असतो. पण अचानक येणाऱ्या अडचणींमुळे तुमच्या सगळ्या योजना बदलू शकतात. एखादी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, घरगुती अडचण किंवा आकस्मिक संकटांमुळे तुम्हाला तुमचा प्रवास रद्द करावा लागू शकतो किंवा अर्धवट सोडावा लागू शकतो. याच कारणासाठी ट्रिप इंटरप्शन आणि कॅन्सलेशन इन्श्युरन्स असणे गरजेचे आहे. या कव्हरेज मुळे प्रीपेड आणि नॉन-रिफंडेबल बुकिंगवरील खर्चाची रिएम्बर्समेंट करण्यास मदत मिळते; तसेच, जर काही वैध कारणांमुळे ट्रिप रवाना होण्यापूर्वीच कॅन्सल झाली किंवा ट्रिप मध्येच थांबवावी लागल्यास तुमचा ट्रिपवरील सर्व पात्र खर्च परत मिळतो. यामुळे अचानक मोठ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळते. तुमच्या प्रवास खर्चाला किंवा गुंतवणुकीला एक खात्रीशीर संरक्षण मिळते.जेव्हा काही अनपेक्षित घटनांमुळे तुमची ट्रिप रवाना होण्यापूर्वीच कॅन्सल झाल्यास किंवा ट्रिप पूर्ण होण्यापूर्वीच अर्ध्यावरच सोडावी लागल्यास ट्रिप इंटरप्शन आणि ट्रिप कॅन्सलेशन इन्श्युरन्स तुम्हाला आर्थिक संरक्षण उपलब्ध होते. ट्रिप कॅन्सलेशन होण्याचे कारण जर इन्श्युरन्स कंपनीच्या नियमांत बसत असेल तर प्रवाशांना यापूर्वी केलेला आणि नॉन-रिफंडेबल खर्चही परत मिळतो. प्रवासादरम्यान आलेली वैद्यकीय आणीबाणी कुटुंबातील एखाद्या जवळच्या सदस्याचे आजारपण किंवा मृत्यू, राहत्या ठिकाणी किंवा प्रवासाच्या ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती, प्रवासाच्या ठिकाणी झालेली राजकीय अशांतता, किंवा पासपोर्ट वा व्हिसा यांसारखी महत्त्वाची प्रवास डॉक्युमेंट हरवणे किंवा चोरीला जाणे अशा परिस्थितींमध्ये हे कव्हरेज बहुधा लागू होते. या अडचणींच्या वेळी ट्रिप इंटरप्शन आणि कॅन्सलेशन इन्श्युरन्स खूप फायद्याचा ठरतो. यामुळे अचानक येणाऱ्या संकटांमुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होत नाही आणि तुमच्या नियंत्रणात नसलेल्या कारणांमुळे ट्रिपच्या पैशांवरही पाणी सोडावे लागत नाही.

ट्रिप पूर्वी: तुमची ट्रिप सुरू होण्याआधी, जर आजारपण किंवा नैसर्गिक संकटामुळे ट्रिप रद्द करण्याची वेळ आली तर हा इन्श्युरन्स तुम्हाला आधीच मदत करू शकतो. अशा परिस्थितीत, ही पॉलिसी विमानाची तिकिटे, हॉटेल बुकिंग, फिरण्याचा खर्च, आधीच बुक केलेले कार्यक्रम आणि अ‍ॅक्टिव्हिटीज यांसारखा नॉन-रिफंडेबल खर्च रिएम्बर्स करते. जेणेकरून तुमचे आधीच अ‍ॅडव्हान्स दिलेले पैसे बुडत नाहीत.

ट्रिप दरम्यान: प्रवास सुरू असताना अचानक उद्भवणाऱ्या समस्या किंवा नुकसानीची भरपाईसुद्धा यात मिळू शकते. फ्लाईट कॅन्सलेशन, खराब हवामान किंवा पासपोर्टसारखी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स गहाळ होणे, यांसारख्या परिस्थितीमुळे एक्स्ट्रा खर्च करावा लागू शकतो. या इन्श्युरन्समुळे जेवण, हॉटेलचा खर्च, लवकरची फ्लाईट घेण्यासह प्रवासाचे शुल्क आणि ट्रिपसाठी केलेल्या नॉन-रिफंडेबल बुकिंगचे पैसे परत मिळण्यास मदत होते. थोडक्यात सांगायचे तर, ट्रिपमध्ये काही अडचण आल्यास यामुळे आर्थिक सपोर्ट मिळतो. ज्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या संकटांचा ताण कमी होतो आणि तुमचे मोठे नुकसान होण्यापासून बचाव होतो.

जरी ट्रिप इंटरप्शन आणि कॅन्सलेशन इन्श्युरन्स तुमच्या पैशांना संरक्षण प्रदान करत असला तरीही त्याचे नियम आणि मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे. पॉलिसीचे नियम अचानक येणाऱ्या अडचणींना कव्हर करण्यासाठी असतात; त्यामुळे साहजिकच काही गोष्टी या कव्हरेजमध्ये येत नाहीत. उदाहरण द्यायचे तर, नवीन वैद्यकीय समस्या आल्यास त्याचे रिएम्बर्समेंट सहज मिळते, पण पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीपासून असलेल्या आजारांसाठी ती मिळत नाही. निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातांना, तसेच न्यायालयाकडून बजावण्यात आलेले समन्स यांसारख्या कायदेशीर गोष्टी या कव्हरेजच्या कक्षेबाहेर असतात. तसेच गरोदरपण, बाळंतपण आणि वैद्यकीय सल्ल्याच्या विरोधात जाऊन केलेला प्रवास या गोष्टी सहसा पॉलिसीत समाविष्ट नसतात. या अपवादांची जाणीव ठेवून प्रवासी त्यांच्या पॉलिसीचे फायदे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. योग्य निर्णय घेऊ शकतात आणि त्यांच्या वैयक्तिक गरजा व ट्रिपच्या पद्धतीनुसार अचूक इन्श्युरन्स निवडू शकतात.

ट्रिप इंटरप्शन आणि कॅन्सलेशन कव्हरेज असलेला ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेतल्याने अचानक ट्रिपमध्ये येणाऱ्या अडथळ्यांसाठी प्रवासी आर्थिकदृष्ट्या तयार राहतात. हा इन्श्युरन्स तुमचे नॉन-रिफंडेबल पैसे आणि शेवटच्या – क्षणाला बदललेल्या योजनेमुळे वाढणारा खर्च भरून काढतो; यामुळे अचानक येणाऱ्या अडचणींचा त्रास कमी होतो आणि तुम्ही तुमची ट्रिप कोणत्याही समस्येशिवाय पुढे सुरू ठेवू शकता. अचानक होणाऱ्या आर्थिक नुकसानीची काळजी करण्याऐवजी, प्रवासी केवळ आपल्या प्रवासाच्या आनंदावर लक्ष केंद्रित करू शकतात; कारण परिस्थिती कशीही बदलली तरी त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहते.

 

 

 

 

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!