गोकुळ निवडणूकीत आ.सतेज पाटील यांची राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा

 

कोल्हापूर : कोल्हापूरमधील ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ‘राजर्षी शाहू शेतकरी आघाडी’च्या (समान विचारसरणीच्या गटाच्या) उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्याचा प्रमुख दूध उत्पादक संघ आणि कोल्हापूर जिल्ह्याचं आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळसाठी आज महायुती आणि राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने ७ विद्यमान आणि १८ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकूण २५ जागांसाठी १८ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.२५ विरुद्ध शून्य हे महायुतीचे स्वप्न कधीच खरे ठरणार नाही या उलट २५ रुपयाने दूध उत्पादकांना दर वाढवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शक्तीपीठ चा मुद्दा हा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे कारण जर शक्तीपिठामुळे शेतकऱ्यांच्या पीकाऊ जमिनी गेल्या तर त्याचा परिणाम दूध उत्पादनावर देखील होणार आहे असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

Comments are closed.

error: Content is protected !!