मुंबई: एखाद्या चक्रात अडकल्यावर मुक्तीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यवस्थेचा सामना करण्यास भाग पाडले जाते; ज्यावरचा विश्वास त्याने एकदा गमावला होता. अशास्थितीत नेमके काय घडते? आनंद दिलीप गोखले लिखित आणि दिग्दर्शित; मंजिरी सुबोध भावे यांच्या कान्हाज् मॅजिकची निर्मिती असलेली कोण यशवंत पानसरे? म्हणजे न्याय, सत्ता आणि सत्याशी संबंधित गुंतागुंतीच्या छेदनबिंदूचा शोध घेणारा हा एक खिळवून ठेवणारा कोर्टरूम ड्रामा तसेच एक तपास-आधारित थरारपट आहे. समीक्षकांनी गौरवलेल्या तमिळ Zee5 सिरीजच्या ‘सत्तामुम नीधियम’ वरून रुपांतर केलेली ही मालिका, एका व्यक्तीचा अपराधीभाव आणि आत्म-संशयावरुन धैर्य तसेच सुटकेच्या खोलवरील वैयक्तिक प्रवासाचा मागोवा घेताना आव्हानात्मक व्यवस्थेच्या परिणामांचा अभ्यास करते. भरत जाधव, शिवानी रांगोळे, पुष्कर श्रोत्री, शर्वरी जमेनीस, उज्ज्वला जोग, विद्याधर जोशी, मिलिंद फाटक यांच्या सहज अदाकारीने नटलेल्या ‘कोण यशवंत पानसरे?’ चा प्रीमियर दिनांक 16 ऑक्टोबर 2026 रोजी मराठी Zee 5 वर होणार आहे.‘कोण यशवंत पानसरे’ ही मालिका तपास आणि कोर्टरूम ड्रामाचा अनोखा संगम सादर करते. अलका बेपत्ता होण्यामागील रहस्य उलगडत असताना कथा न्यायालयीन प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन अनेक पैलू समोर आणते. यशवंत पानसरे यांचा न्यायासाठीचा लढा हा केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित राहत नाही, तर तो त्यांच्या भूतकाळाला सामोरे जाण्याचा आणि वकील म्हणून स्वतःची ओळख पुन्हा सिद्ध करण्याचा वैयक्तिक प्रवास ठरतो. न्यायाच्या शोधात असलेली व्यक्ती आणि शक्तिशाली संस्थात्मक तसेच राजकीय व्यवस्था यांच्यातील संघर्षही या मालिकेतून अधोरेखित होतो. जनहित याचिकेचे रूपांतर हेबिअस कॉर्पस सुनावणीत होत असताना, प्रत्येक नवा खुलासा प्रेक्षकांना सत्य परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडतो. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींचे म्हणणे व्यवस्थेकडून दुर्लक्षित राहिल्यास त्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी एखादी व्यक्ती उभी राहिल्यास पुढे काय घडते, याचा शोध ही मालिका घेते. यशवंत पानसरे यांच्या व्यक्तिरेखेला अभिनेता भरत जाधव यांनी वेगळ्या आणि दमदार स्वरूपात साकारले आहे. या भूमिकेतील भावनिक गुंतागुंत, असुरक्षितता आणि व्यक्तिरेखेची खोली त्यांनी प्रभावीपणे उलगडली आहे.अभिनेता भरत जाधव म्हणाले, “यशवंत पानसरे हे एक असे पात्र आहे जे त्या व्यक्तिरेखेच्या पदरामुळे मला निराळे वाटले. तो एक असा माणूस आहे ज्याने अपयश अनुभवले आहे. स्वत:च्या भूतकाळाचे ओझे उचलले आहे आणि स्वतःवरील विश्वास जवळजवळ गमावला आहे. त्याच्या प्रवासाला मनोरंजक बनवणारी गोष्ट म्हणजे तो अचानक नायक होत नाही;
अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणाला, “मला सारडाकडे ज्या गोष्टीने आकर्षित केले ती गोष्ट म्हणजे तो निव्वळ कोर्टरूममध्ये पानसरेसमोर उभा राहणारा माणूस नाही. तो एक असा वकील आहे. ज्याला व्यवस्था, तिची कार्यपद्धती आणि त्यासोबत येणारी शक्ती समजते. ज्यामुळे पानसरेशी असलेल्या त्याच्या संघर्षाला अनेक पदर फुटतात. त्यांच्यातील न्यायालयीन देवाणघेवाण केवळ युक्तिवाद जिंकण्याबद्दल नसून कायदा, न्याय आणि व्यवस्थेवरील दोन अतिशय भिन्न दृष्टीकोन प्रतिबिंबित करतात. सारडा साकरण्यासाठी विशिष्ट संयमाची आवश्यकता होती. कारण त्याच्यातील अधिकार दर्शवायचा होता. नाट्यकलेपेक्षा त्या भूमिकेत असलेला संयम अनुभवातून येतो. कोण यशवंत पानसरे?
अभिनेत्री शिवानी रांगोळे म्हणाली, “जान्हवी ही अशी व्यक्ती आहे जी वयाचा, अनुभवाचा किंवा एखाद्या गोष्टी करण्याच्या प्रस्थापित पद्धतींचा स्वीकार करण्यास नकार देते. आपण किती दूर जाऊ शकतो हे स्वत: ठरवते. मला तिच्याबद्दल सर्वात मनोरंजक वाटणारी बाब म्हणजे तिची निर्भयता! जी तिच्या दृढनिश्चयातून येते – इतरांनी आदर्श म्हणून काय स्वीकारले आहे यावर प्रश्न विचारायला ती तयार असते. पानसरे यांच्याशी तिचा संबंध देखील कथेचा एक महत्त्वाचा भाग बनतो, कारण ते वेगवेगळ्या टप्प्यांतून या प्रकरणाकडे जात असताना, ते दोघेही आपापल्या पद्धतीने व्यवस्थेला आव्हान देतात. लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले, “कोण यशवंत पानसरे? व्यवस्था उत्तरे शोधणे बंद करते म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती बंद करण्यात येणाऱ्या खटल्याला विरोध दर्शवते तेव्हा काय घडते यावर ही कथा भाष्य करते. यशवंत पानसरे या व्यक्तिरेखेने भूतकाळातील अपयशामुळे आधीच स्वतःचा एक भाग गमावला आहे. हे प्रकरण त्याला त्या अपयशाचा सामना करण्यास भाग पाडते.
