कोल्हापूर: छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीने गोकुळ पंचवार्षिक निवडणूक २०२६-३१ च्या प्रचाराचा शुभारंभ करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन आणि नारळ अर्पण करण्यात आला.
तसेच महायुतीच्या या पॅनलचा जाहीरनामा सर्वांच्या उपस्थित प्रसिद्ध करण्यात आला. हा जाहीरनामा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा, गोकुळच्या सर्वांगीण विकासाचा आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारा दूरदर्शी संकल्पनामा आहे.येत्या १८ ऑक्टोबर रोजी कपबशी या चिन्हासमोर शिक्का मारून छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या २५ जागा प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी केला.याप्रसंगी नामदार चंद्रकांत पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार . अमल महाडिक, आमदार .चंद्रदीप नरके, आ अशोकराव माने, आमदार श्री. राहुल आवाडे, माजी मंत्री श्री. भरमुअण्णा पाटील, माजी आमदार . के.पी. पाटील, . संजयबाबा घाटगे, .राजेश पाटील, श्री. सुरेश हाळवणकर,. सुचित मिणचेकर, जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम, सौ. शौमिका महाडिक, समरजीतसिंह घाटगे, राहुल पाटील आदी मान्यवर तसेच छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार, दूध उत्पादक शेतकरी, ठराव धारक आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
