कोल्हापूर: पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. या मेळाव्याला आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, राजीव किसनराव आवळे यांच्यासह आमदार सतेज पाटील उपस्थित राहीले. पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न जाणणारे आहेत.शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना प्रभावीपणे सोडवण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि कार्याचा निश्चितच उपयोग होईल. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी, शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि पदवीधरांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आपण महाविकास आघाडीचे हे दोन्ही उमेदवार निवडून देऊया असे त्यांनी आवाहन यावेळी केले. यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, शहराध्यक्ष प्रविण केसरकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, मेहबूब शेख, जेष्ठ नेते व्ही. बी. पाटील, कॉ. दिलीप पोवार, कॉ. उदय नारकर, बाबुराव कदम, सारंग श्रीनिवास पाटील, प्रभाकर देशमुख, शशांक बावचकर, सरलाताई पाटील, मदन कारंडे, तौफिक मुल्लाणी, कॉ. सतीशचंद्र कांबळे, अनिल घाटगे, प्रा. टी. एस. पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
