‘आता युद्ध अटळ’ नात्यांमधिल रणांगण ११ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित

 

कोल्हापूर :- दिवसेंदिवस एका पेक्षा एक वरचढ चित्रपट मराठी सिनेसृष्टीत येत आहेत. याच यादीत ५२ विक्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्युशन आणि हार्वे फिल्म्स निर्मित रणांगण या चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट  येत्या ११ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाच्या संपूर्ण टीमने कोल्हापुरात पत्रकारांशी मुक्त संवाद साधला.स्वप्निल जोशी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशी भूमिका मी पहिल्यांदा केली. माझ्यासाठी हे आव्हान होते. पण याही भूमिकेत मी प्रेक्षकांना आवडेन असा विश्वास स्वप्निलने व्यक्त केला.दर्जेदार चित्रपट असतील तर प्रेक्षक त्याला नक्कीच न्याय देतात. पण याचबरोबर आपली मराठी भाषा, खाद्यसंस्कृती याला जपणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे असे प्रमुख भूमिकेत असणारे सचिन पिळगावकर यांनी सांगितले. मराठी भाषा ही आपली आई आहे. इतर भाषा जरूर शिकाव्यात पण आपल्या आईला सोडून इतर भाषा शिकणे हे मराठी माणसाने करू नये अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

‘रणांगण’ या चित्रपटातून आपल्याला कुटुंबाची मानमर्यादा जपत असताना कुटुंबातील व्यक्तीकडून खेळले जाणारे डावपेच आणि त्या एकंदरीत वातावरणात वेठीला धरलेलं कुटुंब याचं सुंदर चित्रण पाहता येणार आहे असे दिग्दर्शिक राजेश सारंग यांनी सांगितले. सिद्धार्थ चांदेकर, सुचित्रा बांदेकर, प्रणाली घोगरे,आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून कलियुगात बदलत चाललेल्या नात्यांची व्याख्या स्पष्ट करणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.या चित्रपटात एकूण ४ गाणी असून या ४ ही गाण्याचे संगीतकार वेगवेगळे आहे. अवधूत गुप्ते, राहुल रानडे, शशांक पोवार आणि सचिन पिळगावकर यांनी गाणी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटाला साजेशी गाणी गुरु ठाकूर, समीर सावंत यांनी लिहिली असून या चित्रपटाच्या गीतांना आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते यांचे स्वर लाभले आहेत.दमदार कथानक,उत्कृष्ट मांडणी, जबरदस्त स्टार कास्ट , प्रेक्षकांना ताल धरायला लावणारे संगीत यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!