
कोल्हापूर : स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्या प्रबोधिनी हि संस्था अत्यंत चांगल्या प्रकारे वाटचाल करीत आहे. प्रामुख्याचे ग्रामीण भागातील विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक चांगल्या संधी उपलब्ध करून देणे हा यामागचा संस्थेचा उद्देश असून त्या दृष्टीने संस्थेमध्ये विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले जाते. या माध्यमातून विद्या प्रबोधिनीने आपल्या यशस्वी कामगिरीची वाटचाल कायम ठेवली आहे.नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक (STI) परीक्षेत विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची कु.गीतांजली साठे हि मागासवर्गीय मुलींमध्ये ५ वी आली आहे. तिच्या यशाबद्दल विद्या प्रबोधिनी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये तीचा संस्थेचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कु.गीतांजली साठे हिला विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, MPSC विभाग प्रमुख अमित लव्हटे,बँकिग विभाग प्रमुख सौ वृंदा सलगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply