गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच ‘बॉईज’ सारखा सुपरहिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या ‘वाघेऱ्या’ हा विनोदी सिनेमा प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी लवकरच येत आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित या सिनेमाच्या सर्व टीमने नुकताच ‘पाणी फाउंडेशन’च्या पाणी बचाव आंदोलनात आपला सहयोग देत, सातारा येथील करंजस्कोप गावात महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने महाश्रमदान केले. पाणी बचाव फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि करंजस्कोप ग्रामस्थांसोबत श्रमदान करताना, अभिनेते किशोर कदम आणि किशोर चौघुले यांनी पाणी वाचवण्याचा सामाजिक संदेशदेखील लोकांना दिला.उन्हाच्या वाढत्या कहालीत हास्याचा थंडावा घेऊन येणारा ‘वाघेऱ्या’ सिनेमा येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यात ऋषिकेश जोशी, किशोर कदम आणि भारत गणेशपुरे यांची प्रमुख भूमिका असून, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम हे कलाकारदेखील आहेत.

Leave a Reply