
कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रात होत असणारे नवनवीन बदल आत्मसात करणे अपरिहार्य असते.कामातील अनियमितता, व्याप, धावपळ यामुळे स्वतः च्या आहारविषयी लोक जागरूक रहात नाहीत. याचा विपरित परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आहाराबाबत योग्य ती काळजी कशी घ्यावी यासाठी जिल्ह्यातील सर्व डायटीशनसाठी इव्हेंट शुअर प्लॅनर व डायटीशन ग्रुपच्या वतीने एक दिवसीय डायटीशन परिषदेचे आयोजन रविवारी ६ मे रोजी करण्यात आले आहे. हॉटेल पर्ल येथे ही एक दिवसीय परिषद घेण्यात येणार आहे. डायटीशन रुफीना कुटीन्हो आणि डॉ.साई प्रसाद यांनी या परिषदेबाबतची भूमिका पत्रकार परिषदेत विशद केली.
दि.६ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ चालणाऱ्या या परिषदेत इंडियन डायटीशन असोसिएशन पुणे शाखेच्या अध्यक्षा सौ.अनुजा किणीकर या ‘आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर मार्गदर्शन करतील. डायमंड हॉस्पिटलचे मुख्य तत्वज डॉ. साई प्रसाद हे ‘अत्याव्यस्थ रुग्ण्यामध्ये पोषणाचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच अँपल सरस्वती हॉस्पिटलच्या मुख्य डायटीशन रुफिना कुटीन्हो यांचेही मार्गदर्शन असणार आहे.
रविवारी दुपारी १२ वाजता इंडियन डायटीशन असोसिएशन पुणे शाखेच्या अध्यक्षा सौ. अनुजा किणीकर आणि डॉ.साई प्रसाद यांच्या शुभ हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
या परिषदेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून १५० हून अधिक डायटीशन व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.याचा लाभ जास्तीत जास्त डायटीशन व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला डॉ.साई प्रसाद,रुफिना कुटींव्हो ,महेश धामणकर उपस्थित होते.
Leave a Reply