
कोल्हापुर : प्रत्येकाला जातिवंत कुत्री (डॉग) असावेत असे वाटत असते मात्र भटक्या कुत्र्यांना कोणीच वाली नसते . अपघातामध्ये अथवा अन्य कारणांनी ती मारून जातात याचा विचार करून आशा कुत्र्यांना (डॉग) याना निवारा मिळावा व हक्काचे घर मिळावे यासाठी फेथ फौंडेशनने आशा पिलांना एकत्र आणून त्यांचे संगोपन करून ज्याना हवे आहे त्यांना ते मोफत देणार आहे.अशी माहिती राज कोरगावकर,सौरभ कुलकर्णी व समृद्धी दळवाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.ही पिली १४मे रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजित अॅडोप्शन
कॅम्पमध्ये मोफत दिली जाणार आहेत.हा कॅम्प महाराणी लोन येथे होणार आहे.
फेथ फोंडेशन ही प.महाराष्ट्रातील सर्वात तरुण एन.जी.ओ असुन गेली अनेक वर्ष समाजाच्या विविध घटकांपर्यंत शक्य त्या पद्धतीने मदत पोचवण्यासाठी फेथ फौंडेशन नेहमीच पुढाकार घेते.
आजपर्यंत वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न वारंवार फेथ च्या माध्यमातुन होत आहे.
गरजुंना मदत, महीला सबलकरणासाठी पथनाट्ये, आय ईंडीयन थीमवर आधारीत जनजागृती रॅली, तसेच तृतीयपंथीयासाठी अस्तित्व हा परीसंवाद अशा अनेक माध्यमातुन फेथचे कार्य सुरू आहे.
या दरम्यान या कॅम्पमध्ये येणा-या व्यक्तींना जर कूत्र्याचे पिल्लु आवडल्यास त्यांना ते मोफत दिले जाणार आहे. जेणेकरुन त्या कुत्र्याच्या पिल्लाला हक्काचे घर व रोजचे अन्न मिळावे हाच मुळ उद्देश यामागे आहे. त्याचबरोबर पिल्लाचे अॅडोप्शन करणा-या प्रत्येक व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.
आणि फक्त अॅडोप्शन करुन न थांबता दर एक ते दोन महीन्यांनी फेथ फौंडेशनचे सदस्य त्या पिल्लाचे संगोपन कशा प्रकारे सुरू आहे याची माहीती संबंधीतांकडुन घेणार आहेत.
पत्रकार परीषदेला स्टेफी मेनिझीस, मल्हार माने, आयुषी नरेगल, प्रबोधिनी प्रभुखोत, केदार देसाई, जयश्री देसाई, रजत आदिंसह सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply