पहिल्याच मराठी चित्रपटात माधुरीचा मराठमोळा लूक!

 

मकरसंक्रांतीचं औचित्य साधत, महाराष्ट्राच्या लाडक्या धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाचं ‘बकेट लिस्ट’ हे नाव ट्विटरवर घोषित करून यानिमित्ताने लाँच करण्यात आलेल्या टायटल टीझर पोस्टरवरील माधुरीतला मराठमोळेपणा तिच्या चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकवण्यात यशस्वी ठरला. बॉलिवूडची मराठमोळी अप्सरा माधुरी दीक्षित मराठीत अवतरणार हे ऐकल्यापासून तिचा हा पहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ पाहण्यासाठी सगळेच आसुसले आहेत. माधुरीच्या चाहत्यांच्या मनातली ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. येत्या 25 मे पासून ‘बकेट लिस्ट’ चित्रपट संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात माधुरीचा मराठमोळा लूक तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. आजवर हिंदी चित्रपटात ती अनेकदा मराठी लूक मध्ये दिसली. पण यावेळी चित्रपटही मराठी आणि माधुरीचा लुकही मराठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!