
बकेट लिस्ट’ हा मराठीतील माधुरी दीक्षितचा पहिलाच चित्रपट असून येत्या २५ मे ला तो जगभर प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटाबद्दल व्यक्त होताना माधुरी म्हणते की, ‘बकेट लिस्ट’, हा एक चित्रपट, माझ्या कितीतरी इच्छा पूर्णत्वास नेतोय. गेल्या कित्येक वर्षात मराठी चित्रपट करण्याची अपुरी राहिलेली इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाली तर मराठीमध्ये हाताळल्या जाणाऱ्या विषयांपैकी एका सुंदर कलाकृतीचा भाग मला होता आलं आणि आता करण जोहरची ही गोड भेट मराठी प्रेक्षकांबरोबरच माझ्यासाठी ही हा एक सुंदर अनुभव आहे.
बॉलिवूड मधील प्रख्यात व्यक्तिमत्त्व असलेला निर्माता करण जोहर प्रथमच ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत एक प्रस्तुतकर्ता म्हणून पदार्पण करीत आहे. करण जोहर, धर्मा प्रोडक्शन यांसारख्या मोठं-मोठ्या चित्रपट निर्मात्यांची मराठी चित्रपटसृष्टीकडे वळणारी पाऊलं ही आपल्यासाठी अभिमानस्पद बाब आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबद्दल सांगताना कारण जोहर म्हणतात की, “प्रादेशिक सिनेमांमध्ये केली जाणारी संहितेची हाताळणी भाषेचे सगळे निर्बंध फोल ठरवते, यावर माझा विश्वास होता. बाहुबली चित्रपटाला मिळालेल्या यशाने माझा हा विश्वास अधिक दृढ केला. त्यात माधुरीसारख्या सुपरस्टारला तिच्याच मातृभाषेत लाँन्च करण्याची संधी मला मिळाली, आणि ही संधी मी आनंदाने स्वीकारली. बकेट लिस्ट टीम आणि ए. ए. फिल्म्स यांच्या साथीने मराठी सिनेसृष्टीत धर्मा प्रोडक्शन्सचं पडलेलं हे पहिलं पाऊल बकेट लिस्ट चित्रपटावर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव करेल, अशी आशा मी व्यक्त करतो.”
धर्मा करण जोहर आणि ए ए फिल्म्स प्रस्तुत तसेच डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ हा सिनेमा येत्या 25 मे ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केलेले असून सहलेखिकेची धुरा देवश्री शिवाडेकर हिने सांभाळली आहे, त्यामुळे माधुरीच्या मराठमोळ्या रूपाची आणि ठसकेबाज अशा मराठी बाण्याची जादू आपल्या पहायला मिळणार आहे.
Leave a Reply