गृहिणींना माधुरीचा मोलाचा सल्ला !

 

गेली तीन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माधुरी आपल्या मातृभाषेत कधी सिनेमा करणार असा प्रश्न कित्येक चाहत्यांच्या मनात होता, अखेर बॉलिवूडची ही धकधक गर्ल बकेट लिस्टच्यानिमित्ताने मराठीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केल्यापासून चांगल्या मराठी संहितेच्या शोधात असणारी माधुरी कथा ऐकताक्षणी या कथेच्या प्रेमात पडली आणि या चित्रपटाला तिने होकार कळवला.सगळ्यात कमी लेखलं जाणारं काम म्हणजे गृहिणीचं.. या कामाला तितकसं महत्त्व शक्यतो दिलं जात नाही.. सातत्याने आपल्या परिवारासाठी झटणाऱ्या याच गृहिणीची कथा माधुरी आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपट बकेट लिस्टच्या निमित्ताने आपल्यासमोर घेऊन येत आहे. या सिनेमातून एक गृहिणी साकारत असलेल्या आई, मैत्रीण, बहिण, मुलगी अशा विविध भूमिकांमध्ये माधुरी आपल्याला दिसणार आहे. या सगळ्याच भूमिका उत्कृष्टरित्या साकारताना आपल्या वेगळेपणातून प्रेक्षकांची करमणूक करण्यात माधुरी साकारत असलेली सानेंची सून यशस्वी होईल असा विश्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी दर्शवला आहे. सर्वसामान्य गृहिणी असली तरी प्रत्येकीने संसारात रमताना स्वतः कडेही लक्ष दिले पाहिजे. आपल्या इच्छा आकांक्षा छंद जोपासले पाहिजेत. स्वतःची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा समस्त गृहिणींना मोलाचा सल्ला माधुरीने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!