
कोल्हापूर : १७ मे रोजी मार्केटयार्ड समोरून जात असलेल्या किरण अरविंद कांबळे यांची दुचाकी गाडी स्लीप होऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकी गाडी पायावर पडल्याने किरण कांबळे यांच्या पायाचे हाड मोडले आणि हृदयापासून येणारी पायाची शीर तुटली. कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असल्याने उपचार करायचा तरी कुठे आणि कसा या द्विधा मनस्थितीत आलेल्या कांबळे कुटुंबियांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी मदतीचा हात दिला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नाने डॉ.किरण दोशी यांच्या रुग्णालयात किरण कांबळे यांच्यावर गंभीर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर ऑर्थोपेदिक अँड ट्रोमा केअर सेंटर येथे किरण अरविंद कांबळे यांची भेट घेऊन आपुलकीने विचारपूस केली. यासह डॉ. किरण दोशी यांचे शत्रक्रिया यशस्वी झालेबद्द्ल आभार आणि अभिनंदन करीत किरण कांबळे यांच्यावर करण्यात येणाऱ्या पुढील उपचाराची माहिती घेतली.विक्रमनगर येथे राहणारे किरण अरविंद कांबळे हे घाटगे पाटील कंपनी मध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात. दि.१७ मे २०१८ रोजी किरण अरविंद कांबळे आपल्या दुचाकीवरून जात असताना मार्केट यार्ड समोर दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. या अपघातात किरण कांबळे हे गंभीर जखमी झाले. अशा स्थितीत प्रथम त्यांच्या कुटुबीयांनी त्यांना एका खाजगी ट्रस्ट रूग्णालयात दाखल केले. पण सदर गंभीर शस्त्रकीया या रुग्णालयात होत नसल्याने दि.१८ मे रोजी किरण कांबळे याना सी.पी.आर रुग्णालय येथे आणण्यात आले. परंतु, या ठिकाणीही अशा शास्त्रक्रीयेवर उपचार होणे अशक्य असल्याने हतबल झालेल्या कांबळे कुटुंबीयांसमोर उपचाराचे कोडे निर्माण झाले होते. अशा परिस्थिती किरण कांबळे यांची मुलगी कु.तेजश्री कांबळे हिला आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वैद्यकीय मदतीची माहिती असल्याने तीने आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी थेट संपर्क साधला आणि सविस्तर घटना सांगितली. आमदार राजेश क्षीरसागर यांनीही कोणतीही जाती– धर्म, मतदारसंघ न मानता सामाजिक बांधिलकीतून तातडीने आपल्या प्रतिनिधीस सी.पी.आर रूग्णालयात पाठविले. पण, या ठिकाणी उपचार होणे कठीण असल्याची माहिती प्रतिनिधीने आमदार राजेश क्षीरसागर यांना दिल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीने कोल्हापुरातील प्रसिद्ध ऑर्थोपेदिक सर्जन डॉ. किरण दोशी यांच्याशी संपर्क साधला. डॉ. किरण दोशी यांनीही सकारात्मक भूमिका घेत ही शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी घेतली. यानंतर किरण कांबळे यांना लगेचच डॉ. किरण दोशी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. किरण दोशी यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून प्रथम तुटलेली पायाची शीर जोडण्याची गंभीर शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊन किरण कांबळे यांच्या पायास जीवदान मिळालेच पण किरण कांबळे यांच्यावर येऊ घातलेल्या अपंगत्वाच्या संकटातून त्यांची मुक्तता झाली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विनंती नुसार किरण कांबळे यांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेले प्रयत्न माझ्यासाठी एक वरदान असल्याची गोष्ट किरण कांबळे यांनी बोलत आमदार राजेश क्षीरसागर यांचे आभार मानले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार ८० % समाजकारण आणि २० % राजकारण या मुलमंत्राप्रमाणे आमदार राजेश क्षीरसागर यांची सुरु असलेली ही रुग्णसेवा अविरत सुरु असल्याचा पुन्हा एकदा अनुभव रुग्णांनी घेतला आहे. यावर बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, आमच्या फौंडेशनच्या माध्यमातून उपचार करून घेणाऱ्या तसेच आर्थिक मदतीचा लाभ घेणाऱ्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. कोणतीही मतभेद न ठेवता माणुसकीच्या नात्याने कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांनाही मदत केली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांना एक आधारवड प्राप्त झाला असून, येणाऱ्या काळामध्ये आपली रुग्णसेवा अशीच अविरत सुरु रहाणार असून, मेंदू, हृदय विकार, किडनी, कॅन्सर, पोट विकार, मणक्याचे विकार, हात- पायावरील शस्त्रक्रिया आदी महागड्या विकारांवरील शस्त्रक्रिया किवा उपचार घेनाऱ्या रुग्णानी शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख विशाल देवकुळे, महिला आघाडीच्या रुपाली कवाळे, झोपडपट्टी सेनेचे शहर संघटक संजय बावडेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply