
कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. त्याचा लाभ साडेतीनशेहून अधिक रुग्णांनी घेतला. या शिबिरात मेंदूविकार फिट, पाठ आणि मणक्याचे विकार, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, लहान मुलांचे कॅन्सर व मनोविकार, मधुमेह उच्चदाब आदींबाबत डॉ. शिवशंकर मरजक्के, डॉ. अभिजीत गणपुले,डॉ. प्रिती नाईक, व्ही. व्ही. जोशी, सौरभ भिरुड यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. शिबिराच्या प्रारंभी स्वामी आत्मानंद यांनी दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन केले. यावेळी मृगराज स्वामी, स्वामी देवव्रत वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नाईक, जितेंद्रसिंग रजपूत, रणजित मिरजे, पी.एस. राजे,आर. डी. शिंदे, प्रल्हाद जाधव, बी.जी. मांगले आदी उपस्थित होते. डॉ. प्रमोद घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. अनुराधा शिंदे यांनी आभार मानले. हॉस्पिटलच्या परिचारिका वर्गाने गणेश वंदना तसेच महाराष्ट्र गीतासह विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.यावेळी रुग्ण,नातेवाईक व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply