
कोल्हापूर: कोल्हापूरच्या महापौरपदी कॉग्रेस पक्षाच्या सौ. शोभा पंडितराव बोंद्रे यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली.बोंद्रे यांनी नजीकच्या प्रतिस्पर्धी ताराराणी आघाडीच्या सौ. रूपराणी निकम यांचा पराभव केला
बोंद्रे यांना ४४ मते, तर निकम यांना ३३ मते पडली.
शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी माघार घेतल्याने कॉग्रेसचा विजय अधिक सुकर झाला. शिवसेनेचे चारही नगरसेवक यावेळी गैरहजर होते. शिवसेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा निल्ले यांनी महापौर निवडणुकीतून
माघार घेऊन त्या सभागृहातून निघून गेल्या.सौ. शोभा बोन्द्रे या कोल्हापूरच्या ४६ व्या महापौर आहेत.अत्यंत चुरशीच्या बनलेल्या कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांचा विजय झाला. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सावंत हे विजयी झाले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय शिवसेनेनं गुरुवारी रात्रीच घेतला होता. त्यामुळे काँग्रेसचा विजयाचा मार्ग सोपा झाला होता. शिवसेनेचा हा निर्णय म्हणजे निवडणुकीला कलाटणी देणाराच ठरला. महापौर, उपमहापौर पदासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मतदानात अपेक्षेप्रमाणे शोभा बोंद्रे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची 44 मते मिळाली. तर भाजप-ताराराणी आघाडीच्या रूपाराणी संग्राम निकम यांना 33 मते मिळाली. शिवसेना आधी जाहीर केल्याप्रमाणे तटस्थ राहिली.उपमहापौरपदाच्या निवडणुकीत देखील राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांनी विजय मिळवला. त्यांना आघाडीचे सर्व 44 मते मिळाली. तर भाजप-ताराराणीच्या कमलाकर भोपळे यांना 33 मते मिळाली. या निवडणूकीत शिवसेनेचे 4 नगरसेवक गैरहजर राहीले.
असे आहे पालिकेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस-राष्ट्रवादी: 44
भाजप-ताराराणी: 33
शिवसेना: 04
Leave a Reply